Pune District Urban Co-operative Bank will provide 1000 PPE kits for medical staff.jpg
Pune District Urban Co-operative Bank will provide 1000 PPE kits for medical staff.jpg 
पुणे

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक देणार वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी 1000 पीपीई किट्स

सकाळवृत्तसेवा

पुणे :  कोरोना साथीच्या थैमानात रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस यांच्यासह वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी संरक्षक एक हजार पीपीई किट्स उपलब्ध करून देण्याचा निर्णय पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने घेण्यात आला आहे.

सर्व बँकांच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून पुणे जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांनी एकत्रितरीत्या सामाजिक जाणिवेच्या भावनेतून मदत करण्याची कल्पना मांडली. नागरी सहकारी बँकांचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या निर्णयाचे स्वागत करीत आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला. 

Coronavirus: पुण्यात रुग्णांची संख्या 39; आठ जण बरे होऊन घरी परतले 
याबाबत वैद्यकीय सेवांबाबतचे समन्वयक सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याशी संपर्क साधला. कोरोना बाधितांना मदत करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस व इतर मदतनीस यांच्यासाठी तातडीने पीपीई किट्सची अत्यंत गरज असून, त्याचा तुटवडा असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे वैद्यकीय विभागाकडून मान्यताप्राप्त दर्जाचे उत्पादन करणाऱ्या उत्पादकांशी संपर्क साधून एक हजार किट्स तातडीने पुरवठा करण्याचा निर्णय घेऊन तशी ऑर्डर दिली आहे. हे किट्स दोन दिवसात पुण्यात उपलब्ध होतील.

'एमटीएस' परीक्षा कोरोना लाॅकडाऊन मुळे स्थगित

असोसिएशनच्या या उपक्रमासाठी सदस्य बँकांपैकी मुस्लिम को- ऑपरेटिव्ह बँकेने दोन लाख रुपये , पुणे पीपल्स बँक, विश्वेश्वर सहकारी बँक, महेश सहकारी बँक, सन्मित्र सहकारी बँक, भगिनी निवेदिता सहकारी बँक, शारदा सहकारी बँक, गणेश सहकारी बँक नवी सांगवी , लोणावळा सहकारी बँक यांनी प्रत्येकी एक लाख रुपये, तसेच रामराज्य सहकारी बँक आणि हवेली सहकारी बँकेने प्रत्येकी पन्नास हजार रुपये अशी मदत तातडीने जाहीर केली आहे. तसेच, इतर बँका लवकरच आर्थिक मदतीबाबत निर्णय घेणार आहेत.
या उपक्रमाअंतर्गत सुरुवातीला तातडीने एक हजार किट्स देण्यात येत असून, उपलब्ध होणाऱ्या रकमेतून इतर तातडीने गरज असणारे वैद्यकीय साहित्य पुरविण्यात येणार आहेत. 
Coronavirus: पुण्यात रुग्णांची संख्या 39; आठ जण बरे होऊन घरी परतले 

नागरी सहकारी बँका या नेहमीच समाजात जेव्हा काही अरिष्ट येते त्यावेळेस पुढे येतात. हे यानिमित्ताने पुण्यातील नागरी सहकारी बँकांनी दाखवून दिले आहे. सर्व बँका यामध्ये सामाजिक जाणिवेच्या भावनेने सहभागी होतील. या निमित्ताने डॉक्टर, नर्सेस व इतर सेवकांच्या प्रती समाजाची संवेदनाही व्यक्त होईल, असे पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुभाष मोहिते यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

SCROLL FOR NEXT