Water Tanker sakal
पुणे

Water Tanker : पावसाळ्यात वाढली पुणे जिल्ह्यात टँकरची संख्या; ५८ गावांना ४१ टँकरद्वारे पाणीपुरवठा

पुणे जिल्ह्यातील गावांना टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टॅँकरची संख्या यंदा पावसाळा सुरू होताच वाढली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्ह्यातील गावांना टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टॅँकरची संख्या यंदा पावसाळा सुरू होताच वाढली आहे. सध्या जिल्ह्यातील ५८ गावे २५० वाड्यांना ४१ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ८९ हजार ३७३ लोकसंख्येची तहान टँकरच्या पाण्याद्वारे भागविण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आज अखेरपर्यंतच्या टँकरच्या संख्या ही २५ ने कमी झाली आहे. गतवर्षी आजअखेर जिल्ह्यात ६६ टॅँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता.

यंदा उन्हाळ्यात खुपच उशिराने टँकर सुरु करावे लागले आहेत. जिल्ह्यात अगदी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केवळ १० टँकर सुरु झाले होते. जून महिना हा पाऊस सुरु होण्याचा महिना असतो. त्यामुळे जूनमध्ये पाऊस पडला की, टँकरची संख्या कमी होत असते. परंतु यंदा जूनमध्ये जिल्ह्यातील टँकरची संख्या वाढून ती ४१ वर गेली आहे.

सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यातील १३ पैकी नऊ तालुके टँकरमुक्त आहेत. उर्वरित चार तालुक्यात ४१ टँकर सुरु आहेत. त्यामध्ये भोर, आंबेगाव, जुन्नर आणि खेडचा समावेश आहे. यापैकी सर्वाधिक १४ टॅंकर आंबेगाव तालुक्यात सुरु आहेत. येथील १३ गावांमधील २८ हजार ३९१ लोकसंख्येला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. खेड तालुक्यातील २३, जुन्नर तालुक्यातील १६ आणि भोर तालुक्यातील सहा गावांसाठी टँकर सुरू आहेत.

टॅंकरमुक्त नऊ तालुके

बारामती, इंदापूर, दौंड, हवेली, मावळ, मुळशी, पुरंदर, शिरूर आणि वेल्हे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT