पुणे

पुण्याच्या हवेचा दर्जा खालावला

CD

पुणे, ता. ८ : दिवाळीच्या सणादरम्यान पुण्यातील हवेच्या गुणवत्तेवर फटाक्यांच्या आतषबाजीचा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळनंतर हवाप्रदूषणात लक्षणीय वाढ झाली. रात्री नऊ वाजता शहराचा सरासरी हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) १६३ इतका होता. शिवाजीनगरमध्ये सर्वाधिक २०४, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात सर्वांत कमी ११३ ‘एक्युआय’ नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे दिवाळीच्या पहिल्या तीन दिवसांच्या तुलनेत लक्ष्मीपूजनाच्या रात्री हवेची गुणवत्ता खालावली.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) ‘समीर’ या मोबाईल ॲपवर उपलब्ध आकडेवारीनुसार, पाच ते सात नोव्हेंबर या तीन दिवसांत हवेचा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक श्रेणीत होता. मात्र, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी प्रदूषणात वाढ होण्यास सुरुवात झाली. ‘एक्यूआय’ रात्री नऊ वाजता १६३ पर्यंत पोहोचला. व्यापारी पेठा, बाजारपेठा आणि वर्दळीच्या परिसरात फटाक्यांची आतषबाजी मोठ्या प्रमाणात झाल्याने प्रदूषणात वाढ झाल्याचे दिसून आले.

हवेतील प्रदूषण मोजण्यासाठी पीएम २.५ आणि पीएम १० या अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण महत्त्वाचे मानले जाते. फटाके उडविल्यानंतर निर्माण होणारा धूर, राख आणि सूक्ष्म धूलिकण हवेत मिसळतात. त्यामुळे या कणांचे प्रमाण वाढून हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. विशेषतः पीएम २.५ हे अतिसूक्ष्म कण श्वसनमार्गातून फुफ्फुसांपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींना याचा अधिक त्रास होण्याची शक्यता असते.

यंदा दिवाळीच्या काळात पावसाने हजेरी न लावल्याने हवेत साचलेले प्रदूषक कण वाहून जाण्याची प्रक्रिया मर्यादित राहिली. त्यातच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके उडविण्यात आल्याने प्रदूषणात भर पडली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र फटाक्यांची आतषबाजी काहीशी कमी प्रमाणात झाली.

हवेचा गुणवत्ता निर्देशांक अन्‌ स्थिती
० ते १०० : उत्तम हवा
१०० ते २०० : समाधानकारक
२०० ते ३०० : वाईट
३०० ते ४०० : अत्यंत वाईट
४०० ते ५०० : अतिधोकादायक (गंभीर)

दिवाळीतील हवेची गुणवत्ता (एक्युआय)
५ नोव्हेंबर : १३०
६ नोव्हेंबर : १३४
७ नोव्हेंबर : १५७
८ नोव्हेंबर (सरासरी) : १६३

परिसरनिहाय स्थिती (एक्युआय)
धनकवडी : १७८
हडपसर : २००
कात्रज डेअरी : १३९
म्हाडा कॉलनी : १६१
पंचवटी, पाषाण : १३४
शिवाजीनगर : २०४
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : ११३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Judge Tukaram Mote Death : दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आलेल्या 42 वर्षीय न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत; कवठेमहांकाळ तालुक्यातील घटनेने हळहळ

Decoration Godown Fire : कोल्हापुरात डेकोरेशनच्या गोडाऊनला भीषण आग; ऐन दिवाळीत फुलेवाडी रिंग रोड परिसरात खळबळ, अग्निशमन दलाचे तीन बंब दाखल

Pune News: वळती अतिरिक्त वीज उपकेंद्राचा मार्ग मोकळा; जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर गणेश महाडीक यांचे उपोषण मागे

Latest Marathi News Live Update: : जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Saudi Arabia Attack : आखातात पुन्हा युद्धाचा भडका! राजधानीवर बंडखोरांचा भीषण क्षेपणास्त्र हल्ला; प्रसिद्ध टॉवरचे मोठे नुकसान!

SCROLL FOR NEXT