पुणे

तुळशीबागेत महिलेची ९० हजारांची रोकड लंपास

CD

पुणे, ता. ७ ः दिवाळीनिमित्त तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या बॅगेतून चोरट्यांनी ९० हजार रुपयांची रोकड लंपास केली. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी कटरने पिशवी कापून रोकड चोरून नेली. याबाबत विश्रामबाग पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी ५० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला पुणे स्टेशन परिसरातील ताडीवाला रस्ता येथे राहतात. त्या शुक्रवारी (ता. ६) दिवाळीनिमित्त तुळशीबागेत खरेदीसाठी आल्या होत्या. दुपारी अडीचच्या सुमारास तुळशीबागेतील गर्दीत चोरट्यांनी त्यांच्या पिशवीवर पाळत ठेवली. गर्दीचा फायदा घेत कटरने पिशवी कापून त्यातील ९० हजार रुपयांची रोकड लांबविली.

मोटारीची काच फोडून ऐवज लंपास
मोटारीची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप आणि पिशवी असा ७१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी परिसरात घडली. याबाबत खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
तक्रारदार एका खासगी कंपनीत कामाला आहेत. त्यांच्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक वाकडेवाडी परिसरात कार घेऊन आले होते. त्यांनी तेथे कार उभी केली होती. चोरट्यांनी काच फोडून आत ठेवलेला लॅपटॉप आणि पिशवी चोरून नेली. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर खडकी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सदनिकेचे कुलूप तोडून चोरी
सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील तीन लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा सहा लाख ७४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना विश्रांतवाडी परिसरात घडली. याबाबत धानोरी परिसरातील मालविका सोसायटीत राहणाऱ्या महिलेने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटातील तीन लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा सहा लाख ७४ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

मार्केट यार्डात सोनसाखळी हिसकावली
पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना मार्केट यार्ड परिसरात घडली. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक आणि त्यांची पत्नी गुरुवारी (ता. ५) रात्री साडेआठच्या सुमारास मार्केट यार्डातील वर्धमानपुरा सोसायटी परिसरातून जात होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली.
या घटनेनंतर चोरटे दुचाकीवरून पसार झाले. सहायक पोलिस निरीक्षक सुजाता जाधव या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dairy Controversy : मग कोरमचा कायदाच का रद्द करत नाही? सतेज पाटील यांचा CM फडणवीसांना प्रतिप्रश्न

Palghar Talasari Earthquake Tremors : पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सत्र पुन्हा सुरू; तलासरीत २.८ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा धक्का, ३१ ऑक्टोबरनंतर पुन्हा भूकंपाने हादरला परिसर

Ashti Tiger Attack Farmer Death Beed News : आष्टी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार; देवळाली परिसरासह तालुक्यात प्रचंड घबराट, सकाळी १० ते ५ या वेळेतच शेतात जाण्याचे वनविभागाचे आवाहन

SIR Controversy: कितीही अटक करा, देशभरात तिरंगा फडकावतच राहणार! अभिजीत दिपकेंचा कोचीत एल्गार

यंदाची दिवाळीही सीमेवरील जवानांसोबत! पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT