पुणे

‘डीजे’विरोधात आवाज उठविणाऱ्या बापट यांना मारहाण

CD

पुणे, ता. ३ : पुण्‍यातील गणेशोत्सवात ‘डीजे’च्या ध्वनिप्रदूषणामुळे सर्वसामान्‍यांना होत असलेल्‍या त्रासाबाबत भूमिका मांडणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना गणेश मंडळाच्या एका कार्यकर्त्याने मारहाण केली. ही घटना टिळक रस्त्यावरील कशाळे चौक परिसरात गुरुवारी (ता. ३) दुपारी बारा वाजण्याच्‍या दरम्‍यान घडली. या घटनेनंतर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
या प्रकरणी आरोपी संतोष शंकर चव्हाण (वय ३४, रा. राऊतवाडी, कोथरूड) याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. त्‍याला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत ‘डीजे’च्‍या अनिर्बंधित वापरामुळे नागरिकांना होत असलेल्‍या ध्वनिप्रदूषणाच्या त्रासावरून विद्यानंद बापट (रा. नारायण पेठ) यांनी आवाज उठविला आहे. महापालिकेत गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीबाबत मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत बापट यांनी कर्णकर्कश ‘डीजे’बरोबरच ढोल-ताशांचा अतिवापर आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत भूमिका मांडली होती. त्यामुळे त्यांच्यावर हा हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे.
कशाळे चौक परिसरात बापट हे आज दुपारी माध्यमांना प्रतिक्रिया देत होते. त्‍या वेळी आरोपीने त्‍यांना चापट मारली. त्‍या वेळी माध्‍यमांच्‍या प्रतिनिधींनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु ‘गणेशोत्सवाच्या विरोधात बोलल्यामुळे याला अजून मारले पाहिजे. त्याला सुट्टी देणार नाही,’ असे म्हणत आरोपीने बापट यांना मारहाण केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली. बापट यांना संरक्षण देत त्यांची तक्रार घेण्यासाठी विश्रामबाग पोलिस ठाण्यात नेले. त्यांच्या तक्रारीनुसार आरोपी चव्‍हाण याच्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.
ध्वनिप्रदूषणाच्या विरोधात मत मांडल्यामुळे एखाद्या व्यक्तीला मारहाण करणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याची प्रतिक्रिया सामाजिक, राजकीय क्षेत्रांतील व्‍यक्‍तींकडून व्यक्त होत आहे.

आरोपी सराईत गुन्हेगार
आरोपी संतोष चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर मारामारी आणि जमाव करून दंगा करणे अशा स्वरूपाचे पाच ते सहा गुन्हे कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल आहेत. हल्ल्यामागचे नेमके कारण काय आहे, याबाबत माहिती घेण्‍याचे काम सुरू असल्‍याची माहिती परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्‍त कृषिकेश रावले यांनी दिली.

बापट यांना पोलिस संरक्षण
हल्‍ल्‍याच्‍या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी बापट यांना खबरदारी म्‍हणून पोलिस संरक्षण दिले आहे. पुढील आदेश येईपर्यंत त्‍यांना सुरक्षा पुरविली जाणार असल्‍याची माहिती पोलिस आयुक्‍त अमितेश कुमार यांनी दिली.

बापट यांच्‍याविरोधातही तक्रार; मात्र गुन्‍हा नाही
हिंदू धर्माच्‍या भावना दुखावल्‍याप्रकरणी बापट यांच्‍याविरोधात गुन्‍हा दाखल करावा, अशी मागणी काही हिंदुत्‍ववादी संघटनांच्‍या कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबत त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्‍यात आयुक्‍त अमितेश कुमार यांची भेट घेतली. यावर पोलिस आयुक्‍तांनी बापट यांच्‍यावर गुन्‍हा दाखल करता येईल, अशी कोणतीही बाब आढळली नसल्‍याचे स्पष्ट केले. त्‍या वेळी काही कार्यकर्त्यांनी आयुक्‍तांशी वाद घालण्‍याचा प्रयत्‍न केला. त्यावर आयुक्‍तांनी मर्यादा पाळून संभाषण करण्‍याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.


पुण्यासारख्या ठिकाणी मला असे वाद हे योग्य वाटत नाहीत. अशा पद्धतीने मारहाण करणे योग्य नाही. शेवटी प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्या पद्धतीने मत मांडत असताना हल्ला करणे हे योग्य नाही. पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

विद्यानंद बापट यांना आरोपीकडून मारहाण झाल्याची घटना अत्‍यंत निंदनीय आहे. आरोपीला अटक केली असून, त्‍याच्‍यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्‍यात येणार आहे.
- अमितेश कुमार, पोलिस आयुक्‍त, पुणे शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पोलीस संरक्षणात विद्यानंद बापट निवासस्थानी पोहोचले

दुचाकीधारकांना दररोज कमाईची संधी, केंद्रीय मंत्री गडकरींनी दिली मोठी माहिती; ड्रायव्हिंग लायसनबाबतही नवा नियम

तब्बल ९२ किलोची होती जान्हवी किल्लेकर; प्रेग्नन्सीनंतर घटवले ४३ किलो पण कसे? म्हणाली, 'मी धावायला जायचे पण...

Yuzvendra Chahal ची जादूई डिलिव्हरी अन् बेन स्टोक्स थेट क्लिन-बोल्ड! फिरकीच्या जाळ्यात कसा अडकला, पाहा Viral Video

Umarga News : उमरगा तालुक्यावर शोककळा! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी मोहिते यांनी चिमुकल्यासह संपविले जीवन; एक मुलगा, एक मुलगी दगावली

SCROLL FOR NEXT