Pune  sakal
पुणे

Pune : डॉक्टरांनी गिरविले अभियंत्यांचे धडे

‘प्रॉब्लेम स्टेटमेंट’वर आधारित एमआयटीचा अभिनव प्रकल्प; मोफत प्रशिक्षण

सम्राट कदम

पुणे : रूग्णसेवेची गरज म्हणून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी चक्क अभियंत्यांचे धडे गिरविले आहे. शस्त्रक्रियेत निष्णात होणाऱ्या हातांनी काळाची गरज म्हणून त्रिमितीय तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण आत्मसात केल असून, प्रॉब्लेम स्टेटमेंटवर आधारित आंतरविद्याशाखीय शिक्षणाचे एक अभिनव उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे.

डॉ. विश्वनाथ कराड एम.आय.टी. विश्वशांती विद्यापीठाच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाने तब्बल १०० डॉक्टरांना मोफत प्रशिक्षण दिले आहे. प्रकल्पाचे मुख्य अन्वेषक प्रा. डॉ. गणेश काकांडीकर सांगतात, ‘‘वैद्यकीय अभ्यासक्रमात त्रिमितीय तंत्रज्ञानासंबंधीच्या ज्ञानाचा अभाव दिसतो. ससून रूग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले या विषयी खंत व्यक्त करत होते. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतूनच एनहंसिन्ग थ्रीडी कॉम्पिटनसिज ऑफ मेडिकल स्कॉलर या प्रकल्पाची प्रेरणा मिळाली.’’ ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पासाठी डसॉल्ट सिस्टीम्सचे आर्थिक सहकार्य लाभले. सात दिवसांच्या या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना त्रिमिती रचना, त्रिमिती स्कॅनिंग आणि त्रिमिती मुद्रणाचे प्रशिक्षण देण्यात येते. डॉ. अनिल माशाळकर आणि डॉ. राहुल जगताप हे सहाय्यक प्रकल्प अन्वेषक आहेत.

वैद्यकीय विज्ञानातील विविध अनुप्रयोगांसाठी त्रिमिती तंत्रज्ञान प्रमुख भूमिका बजावत आहेत. डॉक्टरांनी आता या तंत्रज्ञानाचा वापर योग्य निदान, चांगले उपचार, उत्तम शस्त्रक्रिया आणि रुग्णांच्या काळजीसाठी करणे अपेक्षित आहे. हा प्रकल्प येत्या काही वर्षांत नवोदित डॉक्टरांसाठी मजबूत पाया घालणार आहे.

- हेमंत गाडगीळ, संचालक, ला फाउंडेशन डसॉल्ट सिस्टीम्स

त्रिमिती तंत्रज्ञान कार्यशाळेत सहभागी होणे हा एक चांगला अनुभव होता. त्रिमिती तंत्रज्ञान वैद्यकीय जगतात खूप उपयुक्त आहे. हे तंत्रज्ञान आम्हाला अधिक चांगल्या व्हिज्युअलायझेशनकडे नेईल. दुसऱ्या शब्दांत, मेकॅनिकल अभियांत्रिकी इम्प्लांटच्या डिझाइन आणि विकासासाठी कणा आहे.

- डॉ.नौशाबा रशीद पठाण,

आंतर्वासिता वैद्यकीय विद्यार्थी, एमआयडीएसआर दंत महाविद्यालय, लातूर

त्रिमिती रचना, त्रिमिती स्कॅनींग आणि त्रिमिती मुद्रण या तिन्ही तंत्रज्ञानाचा उपयोग आता प्रामुख्याने दंतरोग, अस्थिरोग आणि इतर विकार यामध्ये होत आहे. पण वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर प्रशिक्षणात या तंत्रज्ञानाचा अभाव आढळतो. वैद्यकीय विद्यार्थ्यांना कारकीर्द सुरु होण्यापूर्वी या तंत्रज्ञानाबद्दल अवगत करण्यासाठी आणि अनुभव देण्यासाठी हा प्रकल्प हाती घेतला आहे, जेणेकरून नवोदित चिकित्सक विद्यार्थीदशेत याचा वापर करून संशोधनाद्वारे उत्तम उपचार आणि वर्धित रुग्णसेवा करू शकतील.

- प्रा. डॉ. गणेश काकांडीकर, प्रकल्प अन्वेषक,

डॉ. विश्वनाथ कराड एम.आय.टी. विश्वशांती विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT