पुणे

'हे' आहे पुण्यातील 'टॅलेंटेड' गाढव!

दिलीप कुर्हाडे

येरवडा : बावधन येथील रेस्क्यू फाउंडेशन प्राणी सहायता केंद्रातील एक मादी गाढव आनंद झाला की चक्क गाणे गाते. तिला पालक, गाजर खायला दिले की ते आनंदी होऊन गाणे गाते. हे गाणारे गाढव पाहण्यासाठी पुणेकरही गर्दी करीत आहेत.

रेस्क्यू प्राणी मित्र संस्थेच्या संचालिका जेसिका रॉबिन्स्‌ म्हणाल्या, ‘‘काही महिन्यांपूर्वी गर्भवती असलेलं एक मादी गाढव रस्त्यावर अतिशय बिकट परिस्थितीत सापडले होते. गाढवाने रस्त्यावरच एका पिल्लाला जन्म दिला होता. मात्र, ते जगले नाही. ती अतिशय अशक्त व पिल्लू मेल्यामुळे ती आक्रमक झाली होती. ती कुणालाही जवळ फिरकू देत नव्हती. खूप प्रयत्नानंतर संस्थेने गाढवाला शांत केले. तिच्यावर योग्य उपचार केले. संस्थेने या गाढवाला प्रेमाने एमिली असे नाव ठेवले.’

काही दिवसानंतर एमिली पूर्णपणे बदलली. ती तिच्या सवंगड्यांसोबत खेळते. विशेष म्हणजे तिला पालक, गाजर खूप आवडते. ते तिला कुणी खाऊ घातले तर ती खूश होऊन चक्क गायला सुरवात करते. यामागे कोणतेही शास्त्रीय कारण देता येत नाही. पण जेव्हा तिला आनंद होतो, तेव्हा ती रेकण्यासोबत गाऊही लागते, असे रॉबिन्स यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Gite Vs Narendra Darade नाशकात महायुतीचं गणित चुकलं, प्रचार थांबवलेला उमेदवार जिंकला; शिंदेंच्या शिलेदाराला धक्का, काय घडलं?

पंकज त्रिपाठीच्या भावावर जीवघेणा हल्ला; प्रकृती चिंताजनक, पोलिसांकडून तपास सुरू

Latest Marathi News Live Update : अमरावती विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे प्रवीण पोटे सलग तिसऱ्यांदा विजयी

Ben Stokes Captain : दंगेखोर बेन स्टोक्स पुन्हा संघात परतला, सोबत 'तो' साथीदारही आला... ECB च्या कारवाईत काय समोर आले?

Pune Bengaluru Highway : पुणे-कोल्हापूर प्रवास आता अधिक सुसाट! महामार्गावरील नवा उड्डाणपूल 'या' वाहनांसाठी खुला; 30 जूननंतर मोठा बदल होणार

SCROLL FOR NEXT