Doppler Radar Sakal
पुणे

Doppler Radar : राज्यात चार नवे रडार पुण्याला मिळणार ‘वेदर डॉप्लर रडार’

भारतीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्थेत केंद्रीय पृथ्वीविज्ञान मंत्री किरण रिजीजू यांच्या भेटी दरम्यान त्यांनी ही माहिती दिली.

सम्राट कदम

Doppler Radar - हवामानाच्या अंदाजाबरोबरच अतिवृष्टीच्या पूर्वसूचनेसाठी वेदर डॉप्लर रडार महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. सध्या मुंबई आणि नागपूरमध्ये असे रडार बसविण्यात आले असून, लवकरच पुण्यातही वेदर डॉप्लर रडार बसविण्यात येईल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र संस्थेचे प्रमुख डॉ. के.एस.होसाळीकर यांनी दिली. भारतीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्थेत केंद्रीय पृथ्वीविज्ञान मंत्री किरण रिजीजू यांच्या भेटी दरम्यान त्यांनी ही माहिती दिली.

हवामानाच्या अचूक अंदाजासाठी महाराष्ट्रातील वेदर डॉप्लर रडारची संख्ये बद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला डॉ. होसाळीकर यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘सध्या मुंबईमध्ये दोन आणि नागपूरमध्ये एक डॉप्लर रडार कार्यरत आहे.

तसेच गोवा आणि तेलंगणातील रडारचाही महाराष्ट्राला फायदा होत आहे. राज्यात नव्याने चार वेदर डॉप्लर रडार बसविण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यासाठी योग्य त्या जागेचा शोध घेण्यात येत आहे. पुण्यातही लवकरच असा रडार बसविण्यात येत असून, जागा शोधण्याचे काम चालू आहे.’’ दिवसेंदिवस नैसर्गिक आपत्तीमध्ये वाढ होत आहे. हवामान बदलामुळे मॉन्सूनचे वर्तनही बदल असून, अतिवृष्टीच्या घटनाही वाढल्या आहे. या पार्श्वभूमीवर राज्याला रडारची मोठी गरज आहे.

काय आहे डॉप्लर रडार..

पावसाची खात्रीशीर माहिती देणारी यंत्रणा म्हणजे वेदर डॉप्लर रडार होय. जगभरात वापरण्यात येणाऱ्या या यंत्रणेद्वारे डॉप्लर रडार विद्युत चुंबकीय लहरी ढगावर सोडते. ढगांकडून परतणाऱ्या लहरी ढगाची 'एक्स रे'प्रमाणे इत्थंभूत माहिती आणतात.

डॉप्लर रडार ढग सरकत असतानाही अचूक माहिती देते. डॉप्लर रडारच्या साहाय्याने पावसाची, ढगफुटीची, गारपिटीची माहिती सहा ते चार तास आधी मिळू शकते. १०० किलोमीटरपर्यंतच्या परिघात पाऊस, गारपीट किंवा ढगफुटी कोठे कोठे होणार, हे किमान एक तास आधी खात्रीपूर्वक अचूक सांगता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

कलाकार खूप फॅन्सी जेवतात? मुळीच नाही, गिरीजा ओकने दाखवलं जेवणाचं ताट; वरणभात, अळूवडी अन्...

Latest Marathi Breaking News:विहिरीत पडला बिबट्या, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Mumbai News: ‘एल्फिन्स्टन’मुळे म्हाडा मालामाल! ८३ घरांच्या माध्यमातून मिळणार तब्बल ९६ कोटी रुपये

"आणि मी कारमधील गणपतीची ओरबाडून काढून फेकली" जुई गडकरीने सांगितला तो प्रसंग; "मी हॉस्पिटलमध्ये.."

SCROLL FOR NEXT