पुणे

Pune : डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

२०२२ मध्ये डॉ. कुरुलकर यांनी सहा देशांना भेटी दिल्या आहेत. तर २०१० ते २०२२ दरम्यान डॉ. कुरुलकर ५३ दिवस परदेशात होते. शासकीय पासपोर्टद्वारे ते परदेशात गेले होते. शासकीय पारपत्राचा वापर करून ते पाकिस्तानी हेरांना भेटल्याचा संशय एटीएसला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या पुण्यातील संशोधन आणि विकास आस्थापना (आर अँड डीई) या प्रयोगशाळेचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयाने डॉ. कुरुलकर यांना १२ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

डॉ. कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला (पीआयओ) काही संवेदनशील माहिती तसेच छायाचित्रे पाठविल्याचा संशय आहे. त्यानुसार ही चौकशी सुरू असल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिली. डॉ. कुरुलकर यांना अटक करण्यात आल्यानंतर एटीएसकडून करण्यात आलेल्या तपासाबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे.

२०२२ मध्ये डॉ. कुरुलकर यांनी सहा देशांना भेटी दिल्या आहेत. तर २०१० ते २०२२ दरम्यान डॉ. कुरुलकर ५३ दिवस परदेशात होते. शासकीय पासपोर्टद्वारे ते परदेशात गेले होते. शासकीय पारपत्राचा वापर करून ते पाकिस्तानी हेरांना भेटल्याचा संशय एटीएसला आहे. परदेशात ते कोणाला भेटले, यादृष्टीने त्यांची चौकशी करण्यात येत आहे. तसेच त्यांची पोलिग्राफ टेस्ट देखील करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT