Dr. Mohan Agashe sakal
पुणे

Pune News : अभ्यासेतर उपक्रमांतून घडतो विद्यार्थी - डॉ. मोहन आगाशे

नूतन मराठी विद्यालयाच्या ‘आम्ही नूमवीय’ या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे डॉ. आगाशे यांना ‘नू.म.वि. जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

नूतन मराठी विद्यालयाच्या ‘आम्ही नूमवीय’ या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे डॉ. आगाशे यांना ‘नू.म.वि. जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

पुणे - ‘आजकाल बौद्धिक दहशतवाद आला आहे. त्यामुळे अभ्यासेतर उपक्रमांना कमी महत्त्व दिले जात आहे. औपचारिक शिक्षण हे पाठ्यपुस्तकातून मिळत असले, तरी अभ्यासेतर उपक्रमातून विद्यार्थी घडत असतो. परंतु तरीही सहज शिक्षणातून जेवढे ज्ञान घेता येईल, तेवढे घ्यावे आणि जगण्याचा आनंद घ्यावा,’ असा कानमंत्र ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी दिला.

नूतन मराठी विद्यालयाच्या ‘आम्ही नूमवीय’ या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे डॉ. आगाशे यांना ‘नू.म.वि. जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्थेचे (अभिमत विद्यापीठ) कुलगुरू डॉ. अजित रानडे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, ‘आम्ही नूमविय’चे अजित रावेतकर, मिलिंद शालगर, पराग ठाकूर, किशोर लोहोकरे, शाळेच्या मुख्याध्यापिका प्राची गुमास्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात ज्येष्ठ अर्थ सल्लागार मुकुंद अभ्यंकर यांनाही जीवनगौरव पुरस्कार दिला. तर माजी सनदी अधिकारी शरद काळे यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला त्यांच्या पत्नी सुनीती काळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तर माधव ढेकणे, रवींद्र कुलकर्णी, रमाकांत परांजपे, प्रकाश भोंडे आणि अॅड. विजय सावंत यांना ‘नू.म.वि. रत्न पुरस्कार’ दिला. ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम, जगदीश आफळे, डॉ.अविनाश भोंडवे, मोहनकुमार भंडारी, प्रमोद फळणीकर आणि डॉ. अमित काळे यांना ‘नू.म.वि. भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तर जसराज जोशी यांना ‘उदयोन्मुख पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

डॉ. आगाशे म्हणाले, ‘बुद्धी हे माणसाचे ज्ञानेंद्रिय नाही. फार अभ्यास करून बुद्धीमत्ता वाढते आणि बुद्धिमत्ता वाढली की अहंकार वाढतो. अहंकार वाढणार नाही, एवढा अभ्यास करा.’ शाळेतील आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, ‘विद्यार्थ्यांमधीलच नव्हे तर शिक्षकांमधील गुण शाळेत हेरले जातात.’ यावेळी डॉ. रानडे म्हणाले, ‘शाळा ही आपल्या आईच्या स्थानी असते. शाळेकडून मिळालेला पुरस्कार याचे आपल्या जीवनात विशेष महत्त्व असते.’ यावेळी संगोराम आणि भोंडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रावेतकर यांनी, तर सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT