Pune Municipal Sakal
पुणे

पुणे महापालिका 11 गावांच्या ड्रेनेजसाठी खर्च करणार 392 कोटी

पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांमध्ये सांडपाणी वहन व्यवस्था, सांडपाणी शुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी तब्बल ३९२ कोटी रुपयांचा प्रकल्प केला जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महापालिकेत (Pune Municipal) नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांमध्ये (Village) सांडपाणी (Drainage Water) वहन व्यवस्था, सांडपाणी शुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी तब्बल ३९२ कोटी रुपयांचा प्रकल्प (Project) केला जाणार आहे. यासाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद पुढील तीन वर्षासाठी अंदाजपत्रकामध्ये (Budget) करावी असा प्रस्ताव आज स्थायी समितीने (Standing Committee) मान्य केला, अशी माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

'समाविष्ट ११ गावांमध्ये सांडपाणी शुद्धीकरणाच्या प्रकल्प अहवाल केला आहे. यामध्ये १११ किलोमीटरच्या सांडपाणी वाहिन्या आणि ५७ किलोमीटरच्या मुख्य सांडपाणी वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. तसेच अस्तित्वातील १४ किलोमीटरच्या वाहिन्यांमध्ये सुधारणा केली जाणार आहे. त्यासाठी अनुक्रमे १०० कोटी ६३ लाख रुपये, १०१ कोटी ८ लाख रुपये आणि १३ कोटी ३७ लाख रुपयांची अंदाजपत्रकीय तरतूद करण्यात आलेली आहे. मांजरी बुद्रूक येथे ९३.५० एमएलडी आणि केशवनगर येथे १२ एमएलडी मैलापाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी १७७ कोटी ८८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. अशाप्रकारे ३९२ कोटी ९६ लाख रुपयांची एकूण तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र, निविदा प्रक्रिया राबविताना यामध्ये नियम व अटी बदलून ठराविक ठेकेदारास काम मिळावे यासाठी उद्योग केला गेला होता. हे प्रकरण ‘सकाळ’ने समोर आणले होते. त्यानंतर आता या प्रकल्पांच्या निविदेची तपासणी करण्यासाठी तांत्रिक समिती नेमली असून, कागदपत्रांची छाननी सुरू आहे.

रासने पुढे म्हणाले, ‘२०४७ पर्यंतचा विचार करून हा प्रकल्प राबविला जात आहे, निविदांमध्ये पुरेशी स्पर्धा व्हावी या उद्देशाने वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. या निविदेत चार कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. तज्ज्ञ सल्लागार प्रायमूव्ह इनफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट यांच्यामार्फत कागदपत्र आणि निकष पूर्ततेची छाननी करण्यात आली. निविदा मूल्यमापन समितीसमोर सादरीकरण करण्यात आले होते.हे काम पुढील तीन आर्थिक वर्षांत तीन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone Security Alert: ‘आयफोन’ वापरत असाल तर आताच करा ‘हे’ काम, अन्यथा तुमचा फोन होणार हॅक!

AAP Pune Manifesto : पुणे पालिकेसाठी 'आप'चा जाहीरनामा प्रसिद्ध; महिलांना मोफत बस प्रवास आणि 'मोहल्ला क्लिनिक'चे आश्वासन!

Sangli Election : एकाच प्रभागात अनेक दावे, अनेक गट, भाजपची अंतर्गत फूट, राष्ट्रवादीची जातीय मांडणी; प्रभाग आठ बनला रणांगण

Mumbai - Goa Highway : कोकणाच्या विकासाचा कणा अजूनही खड्ड्यातच; मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा अंत न दिसणारा प्रवास

Latest Marathi News Live Update : पुणे – नाशिक महामार्गावर रास्तारोको, वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT