Pune sakal
पुणे

Pune : वाघोलीतील बेला व्हिटा सोसायटीत ड्रेनेजचे पाणी, आरोग्याच्या प्रश्नांनी सोसायटीधारक हैराण

सोसायटी परिसरातून सार्वजनिक ड्रेनेज वाहिनी गेलेली आहे. त्याचे पाणी रेन हार्वेस्टिंग केलेल्या सोसायटीच्या टाकीत जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

Pune - येथील प्रियांकानगरी परिसरातील बेला व्हिटा सोसायटीत ड्रेनेजचे पाणी साचत असल्याने सोसायटी धारकांचे हाल होत आहे. पावसामुळे या पाण्यात अधिक भर पडत आहे. आता सोसायटी धारकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. वर्षभरात सोसायटी धारकांनी अनेक तक्रार करूनही त्याची दखल महापालिका घेत नाही. असे सोसायटी धारकांनी सांगितले.

त्यांच्या सोसायटी परिसरातून सार्वजनिक ड्रेनेज वाहिनी गेलेली आहे. त्याचे पाणी रेन हार्वेस्टिंग केलेल्या सोसायटीच्या टाकीत जात आहे. या टाकीच्या बाजूलाच पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. ते पाणी या पिण्याच्या पाण्यात पाझरत असल्याने सोसायटी धारकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

याबाबत सोसायटी धारकांनी महापालिका, वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय, वाघोली कार्यालय सर्व ठिकाणी तक्रार केली. महापालिका कर्मचारी पाहणी करून गेले. मात्र त्यानंतर काहीच कार्यवाही झाली नाही. कर्मचाऱ्यांनी ड्रेनेजचे झाकण उघडून पाहिले.

ते झाकनही उघडलेल्या त्याच स्थितीत आहे. या परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे. सोसायटी धारक डेंगू, मलेरियाने आजारी पडत आहे. मात्र महापालिका लक्ष देत नसल्याचे सोसायटी धारकांचे म्हणणे आहे.

ड्रेनेज पाण्यामुळे सोसायटी धारकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तक्रार करूनही महापालिकेने कार्यवाही केलेली नाही. – संतोष कडलग, सोसायटीधारक

त्या सोसायटी पर्यंत ड्रेनेजचे काम झाले आहे. पुढे त्या वाहिनीचे काम करायचे आहे. त्याचा निधीही मंजूर आहे. सोसायटी धारकांशी चर्चा करून पुढे वाहिनीचे काम पूर्ण केले जाईल.

संजय शिवले, वाघोली कार्यालय अधीक्षक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Well Water Waves विहिरीत समुद्रासारख्या लाटा, पाण्याची गूढ हालचाल; VIRAL VIDEOने खळबळ, गावकऱ्यांनी काय सांगितलं?

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे बरा म्हणायची वेळ आणू नका; फडणवीस, शिंदे, बावनकुळेंसह विखे पाटलांवर मनोज जरांगेंचा घणाघात

Kitchen Vastu Tips: तुमचे स्वयंपाकघर योग्य दिशेला आहे का? जाणून घ्या गॅस शेगडी आणि सिंक कुठे असावे!

Monsoon Skincare Mistakes: पावसाळ्यात स्किनकेअर करताना अनेकजण करतात 'ही' चूक; तुमच्याकडूनही होत नाही ना?

FDA Action: हॉटेल, रेस्टारंटवर करडी नजर, अ‍ॅनालॉग पनीरवरील बंदीनंतर एफडीएची राज्यभरात विशेष तपासणी

SCROLL FOR NEXT