Drainage Sakal
पुणे

पुणे : ड्रेनेजचे पाणी घरात; समस्यांने सागरपार्क सोसायटी त्रस्त

रहिवाशांच्या घराबाहेर हे घाण पाणी साचून सर्वत्र दुर्गंधी पसरली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

रामवाडी : नगररोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत (प्रभाग तीन) वडगावशेरी येथील सागरपार्क सोसायटी लेन नंबर दोन मध्ये वारंवार सांडपाणी वाहिन्या तुंबल्या जावून तिथे राहणार्‍या रहिवाशांच्या घराबाहेर हे घाण पाणी साचून सर्वत्र दुर्गंधी पसरली जात आहे. त्याच बरोबर डासांचा प्रादुर्भाव अधिक वाढत जाऊन तेथील रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या जुन्या वाहिन्या बदलून नविन मोठय़ा व्यासाच्या सांडपाणी वाहिन्या टाकल्या जाव्यात अशी एकमेव मागणी सोसायटीच्या रहिवाशां कडून केली जात आहे. (Pune Marathi News)

सागर पार्क सोसायटी मध्ये जवळ पास 350 नागरिक राहतात. या सोसायटी मध्ये वीस वर्षापूर्वी सांडपाणी वाहिन्या बसविण्यात आल्या . पण त्याची साफसफाई वेळेवर केली जात नाही.तुंबल्यावर क्षेत्रीय कार्यालयात तक्रार केल्या नंतर दखल घेतली जाते . पालिकेच्या कर्मचारी कडून तात्पुरती साफसफाई केल्यावर पुन्हा काही आठवड्याने जैसे थे अशी परिस्थिती निर्माण होते. पावसाळा नसताना सांडपाणी वाहिन्या तुंबून रस्त्यावर तसेच तिथे राहणार्‍या रहिवाशांच्या घराबाहेर शिरते.

हे पाणी काढताना रहिवाशांची दमछाक होते.सतत भिंती ओलसर राहिल्याने कुबट वास येतो त्याच बरोबर किडे आणि घुशीचा परिसरात वावर वाढत जातो. सागरपार्क सोसायटी लेन नंबर दोन मधील जुन्या झालेल्या सांडपाणी वाहिन्या काढून नविन व मोठय़ा व्यासाच्या वाहिन्या टाकल्या जाव्यात अशी मागणी सोसायटीच्या रहिवाशां कडून केली जात आहे. वर्षभरात अनेक वेळा ड्रेनेज लाईन तुंबून ते घाण पाणी माझ्या पिण्याच्या पाण्याची टाकी जाते.

त्याच बरोबर जिन्यामध्ये दोन फुट पाणी साचते. मी आणि माझे वृद्ध वडील आम्ही दोघे बादलीने पाणी उपसून बाहेर काढतो. प्रशासना कडून किमान मूलभूत सुविधा मिळाव्यात एवढीच अपेक्षा आहे. परंतु पुण्या सारख्या स्मार्ट सिटी मध्ये अजुन ड्रेनेज समस्येला सामोरे जावे लागते ही शोकांतिका आहे .

-हर्षदा करमरकर, स्थानिक रहिवासी

सोसायटी मध्ये नवीन सांडपाणी वाहिन्या बसण्यासाठी पालिके कडे निधी उपलब्ध नाही. पुढे निधी उपलब्ध झाल्यावर नविन सांडपाणी वाहिन्या बसविण्यात येतील.

- सुहास जगताप, सहायक आयुक्त, नगररोड क्षेत्रीय कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट रचणारा अमोल खुणे नेमका कोण? जुना सहकारी सुपारीबाज कसा झाला?

Solapur Factory : प्रथमेश पाटील यांना संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती!

Richa Ghosh DSP Appointment : विश्वविजेती रिचा घोष आता थेट ‘DSP’ ; 'बंग भूषण' पुरस्काराने देखील सन्मानित!

स्कॅमर्सनी LinkedIn वर बनवला अड्डा! Commonwealth च्या नावाखाली लोकांची होतीये लूट, तुम्ही पण लिंक्डइनवर असाल तर हे काय आहे बघाच

Latest Marathi News Live Update : वर्सोवा विधानसभा मतदारसंघातही मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ

SCROLL FOR NEXT