Pune Drug Case esakal
पुणे

Pune Drug Case: मालक एक चालवणारे दुसरेच... पुण्यातील ड्रग्ज पार्टी प्रकरणात पोलिसांचा मोठा खुलासा! आतापर्यंत काय कारवाई केली?

Pune Drug Case: काल रात्री एफसी रोडवरील लीजर लाउंज बार नावाचा बार रात्री १.३० नंतरही सुरु होता. बारचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून दुसऱ्या गेटने पार्टी करणाऱ्यांना आत प्रवेश दिला गेला होता.

Sandip Kapde

पुणे: पुण्यातील एफसी रोडवर असलेल्या लिक्विड लीजर लाउंज बारमध्ये ड्रग्ज पार्टी सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत दोन जणांना अटक केली आहे. साम टिव्हीच्या बातमीनंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि लीजर लाउंज बार सील केला. शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील बीट मार्शल यांना निलंबित करण्यात आले आहे.

सोशल मीडियावरून मिळाली माहिती-

पोलीस उपायुक्त संदीप गील यांनी सांगितले की, "एफसी रोडवरील लिक्विड लीजर लाउंज बार लिमिटपेक्षा जास्त वेळ चालला असल्याची माहिती सोशल मीडियावरून मिळाली. बार मालक संतोष कामठे आणि सचिन कामठे यांनी हा बार करार करून तीन लोकांना रेंटवर दिला होता."

रात्रभर चालली पार्टी-

काल रात्री एफसी रोडवरील लीजर लाउंज बार नावाचा बार रात्री १.३० नंतरही सुरु होता. बारचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून दुसऱ्या गेटने पार्टी करणाऱ्यांना आत प्रवेश दिला गेला होता. एका इव्हेंट मॅनेजरने ४० ते ५० लोकांना पार्टी करण्याची परवानगी हॉटेल मालकांकडून घेतली होती.

अटक आणि तपास-

पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले आहे आणि बार सील केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या पदार्थांची तपासणी अमली पदार्थ विरोधी पथक करत आहे. या प्रकरणात १८८ कलम आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त संदीप गील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

कोकण आपलोच आसा! सनई चौघडे मालिकेची टीम पोहचली कणकवलीत, फोटो पाहिलेत का?

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

SCROLL FOR NEXT