murder sakal
पुणे

पुणे : आईला शिवीगाळ करणाऱ्या मद्यपी मुलाची वडिलांनी केली हत्या

आईला शिवीगाळ आणि मद्यपान करणाऱ्या मुलाचा वडिलांनीच गळा दाबून खून केल्याची घटना बोपोडी घडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

आईला शिवीगाळ आणि मद्यपान करणाऱ्या मुलाचा वडिलांनीच गळा दाबून खून केल्याची घटना बोपोडी घडली आहे.

पुणे : आईला शिवीगाळ आणि मद्यपान करणाऱ्या मुलाचा वडिलांनीच गळा दाबून खून केल्याची घटना बोपोडी घडली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर ही बाब समोर आली आहे. त्यानुसार वडिलांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (ता.१८) हा प्रकार घडला.

सनी नागसेन घोडके (वय ३८, रा. बोपोडी याचा मृत्यू झाला असून त्याचे वडील नागसेन घोडके (वय ७२, रा. बोपोडी) याच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. आरोपी, पत्नी आणि सनी हा बोपोडी परिसरात राहत होते. नागसेन हा मंडप टाकण्याचे काम करतो तर सनी कोणतेही काम करत नव्हता. घटनेच्या दिवशी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास नागसेन याचा मृतदेह बोपोडी येथे आढळून आला होता.

त्यावेळी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविल्यानंतर सनीचा मृत्यू हा गंभीर मारहाणीमुळे व गळा दाबून खून केल्यामुळे झाल्याचे अहवालातून समोर आहे. याविषयी त्याच्या वडिलांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनीच मुलाचा खून केल्याचे सांगितले. त्यावर पोलिसांनी त्याला खून करण्याचे कारण विचारले असता मुलाला दारूचे व्यसन होते. घटनेच्या दिवशी मुलगा दारू पिऊन येऊन आईला शिवीगाळ व मारहाण करत असल्याचे पाहून झालेल्या झटापटीत त्याचा मृत्यू झाल्याचे वडिलांनी सांगितले.

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविल्यानंतर शवविच्छेदन अहवालात सनी याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. याबाबत त्याच्या घरात चौकशी केल्यानंतर त्याच्या वडिलांनी मुलाच्या खुनाची कबुली दिली. आईला शिवीगाळ आणि मारहाण करताना झालेल्या वादात हा प्रकार घडल्याचे वडिलांनी सांगितले. याप्रकरणी वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- मच्छिंद्र चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक, खडकी पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT