पुणे

Pune: मंगलदास बांदल यांच्यावर ईडीची कारवाई, चौकशी सुरूच

Latest Ed News : महंमदवाडी (ता. हवेली) येथील निवासस्थानी ईडीचे दुसरे पथक बांदल यांची चौकशी करीत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Latest Pune News: जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या पुण्यातील महम्मदवाडी, शिक्रापूर आणि बुरुंजवाडी (ता.शिरूर) येथील निवासस्थानांवर सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने मंगळवारी (ता. २०) सकाळी साडेसहाच्या सुमारास एकाच वेळी छापे टाकले.

दरम्यान, शिक्रापूर येथील निवासस्थानी त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल, त्यांचे दोन भाऊ व इतर कुटुंबीयांची चौकशी पथक गेल्या १२ तासांपासून करीत आहे. महंमदवाडी (ता. हवेली) येथील निवासस्थानी ईडीचे दुसरे पथक बांदल यांची चौकशी करीत आहे.

बांदल यांच्या शिक्रापूर येथील निवासस्थानी कागदपत्रांची आणि कुटुंबीयांच्या बँक लॉकरची तपासणी अधिकाऱ्यांनी केल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली. या छाप्यांमध्ये काही मुद्देमाल हस्तगत केल्याचेही सांगण्यात आले. ईडीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, माहिती देण्यास नकार दिला.

मनी लॉन्ड्रींगप्रकरणी यापूर्वी बांदल यांना ईडीने एक वर्षभरापूर्वी नोटिसा बजावल्या होत्या. चौकशीसाठी ते चार वेळा ईडीच्या पुणे कार्यालयात हजरही राहिले होते. चौकशीला चांगले सहकार्य करीत होते. याशिवाय तीन वर्षांपूर्वी प्राप्तीकर विभागाकडून बांदल यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला होता.

बांदल हे शिवाजीराव भोसले सहकारी बँक फसवणूकप्रकरणी सध्या जामीनावर बाहेर आहेत. त्याच बॅंक प्रकरणाशी संबंधित ईडीने आजच्या कारवाईचे पाऊल उचलल्याची माहिती बांदल यांच्या जवळच्या नातेवाइकांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

शिवाजीराव भोसले बॅंकेचे प्रकरण, दोन बॅंक अधिकाऱ्यांवरही छापा

बांदल यांच्या निवासस्थानांवरील छाप्याबरोबरच ईडीने शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या दोन माजी व्यवस्थापकांच्याही घरी आज पहाटे छापा टाकल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. याबाबत ईडीकडून पुढील कारवाई काय होणार, याचीही उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT