पुणे

बंडखोरांच्या मनधरणीसाठी नेत्यांची पळापळ

CD

पुणे, ता. ८ : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवारी (ता. ९) संपत असल्याने, सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी गुरुवारी दिवसभर मोठी पळापळ केली. दरम्यान, पदवीधर मतदारसंघातून भाजपचे डमी उमेदवार शरद लाड यांनी आपला अर्ज मागे घेतला. आता अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर बंडखोरी रोखण्यात कोणाला किती यश आले, हे स्पष्ट होईल.

पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत दोन दिवसांपूर्वी संपली. दाखल उमेदवारांच्या छाननीनंतर पदवीधरमध्ये ६९, तर शिक्षक मतदारसंघात ४८ अर्ज वैध ठरले. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारी अखेरचा दिवस आहे. उमेदवारी न मिळाल्याने पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात उमेदवारी अर्ज भरत अनेकांनी बंडाचा झेंडा हातात घेतला आहे. हा झेंडा खाली ठेवावा, यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून दिवसभर बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. महायुतीत उमेदवारीवरून पडलेली ठिणगी विझविण्यासाठी गुरुवारी भाजप आणि शिवसेना यांच्यात मुंबईमध्ये चर्चा झाली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनीही दिवसभर बंडखोरांशी संपर्क साधून समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता जाधव यांना, तर शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपकडून अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. या मतदारसंघात भाजपचे शरद लाड यांनी डमी अर्ज दाखल केला होता. जाधव यांचा अर्ज वैध झाला, म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र याच मतदारसंघात महायुतीच्या सत्तेत भागीदार असलेल्या शिंदेसेनेने भाजपविरोधात बंडखोरी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात पक्षातून बंडखोरी झाली आहे. शिक्षक मतदारसंघात भाजपविरोधात जाऊन शिंदेसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांच्या विरोधात पक्षातील दोन उमेदवारांनी बंडाचे निशाण फडकवत अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याच्या दिवसापासूनच सर्व पक्षांच्या नेत्यांची डोकेदुखी वाढणार हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे गुरुवारी दिवसभर सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यात यश आले नाही. त्यामुळे शुक्रवारी माघारीच्या दिवशी पक्षाच्या नेत्यांना कितपत यश येणार, यानंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhruv Rathee Bengaluru Protest : ध्रुव राठी पहिल्यांदाच उतरला रस्त्यावर! बंगळूरमध्ये SIR विरोधात आंदोलन, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी, मोदींवरही सडकून टीका

Viral Picture : डेल टेक्नॉलॉजीजच्या संस्थापकाच्या पत्नीला सोशल मीडियावर केले ट्रोल; संपत्ती वाचून डोळे पांढरे होतील..!?

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्र्यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले

Palghar Earthquake : पालघरला भूकंप,३.७ रिश्टर स्केलचा धक्का; तलासरी तालुक्यातील कुर्झे केंद्रबिंदू, सात किलोमीटर खोलीवर भूकंपाची नोंद

IMD Rain Alert : मोठी बातमी! माॅन्सूनच्या एक्झिट दरम्यान 22 राज्यांत मुसळधार पावसासह वादळाचा अलर्ट; 70 किमी स्पीडने वाहणार वारे, महाराष्ट्रात कशी स्थिती?

SCROLL FOR NEXT