startup guide in pune News 
पुणे

Startup : स्टार्टअप यशस्वी होण्यासाठी नवउद्योजकांना मार्गदर्शन

स्टार्टअप सुरू केल्यानंतर तो यशस्वी होण्यासाठी कोणत्या बाबी आवश्यक असतात त्यासाठी नवोद्योजकांची मानसिकता कशी हवी यावर मार्गदर्शन केले.

सकाळ वृत्तसेवा

Pune News- स्टार्टअप सुरू केल्यानंतर तो यशस्वी होण्यासाठी कोणत्या बाबी आवश्यक असतात त्यासाठी नवोद्योजकांची मानसिकता कशी हवी? स्टार्टअपची अर्थव्यवस्था नेमकी कशी असते? आरोग्य, संपत्ती इत्यादी विषयांवर मार्गदर्शन दिले.

सेतू’चे पहिले सत्र शुक्रवारी (ता. २०) बाणेर रस्त्यावर असलेल्या एसआयआयएलसी मीडिया सेंटरमध्ये पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून व्यवसाय सल्लागार आर. आर. दासगुप्ता, ‘कोरेको’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सूर्यवंशी, धुळकर असोसिएट्सचे संस्थापक प्रतीक धुळकर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘एसआयआयएलसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी निनाद पानसे यांनी केले. ‘‘स्टार्टअपला आवश्यक असलेल्या सेवा अनेक संस्था पुरवितात.

मात्र स्टार्टअप यशस्वी होण्यासाठी आंत्रप्रिनर्सची मानसिकता कशी विकसित झाली पाहिजे, यावर कोणी फोकस करीत नाही. ही मानसिकता निर्माण करण्याचे व वाढविण्याचे काम ‘सेतू’मध्ये केले जात आहे.

सत्राच्या माध्यमातून अनेक स्टार्टअप समजले जे नागरिकांच्या गरजा कशा पूर्ण करीत आहेत तसेच स्टार्टअप यशस्वी होण्यामागील प्रवास लक्षात घेण्यासाठी असे उपक्रम गरजेचे आहेत, अशी सर्व उपस्थित स्टार्टअप्सनी मागणी केली. कार्यक्रमाच्या शेवटी जान्हवी पवार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

स्टार्टअप्सला यशस्वी आणि शाश्वत व्हायचे असेल तर व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी विचारात घेतल्या गेल्या पाहिजे. हे सर्व करीत असताना आपला निसर्गाशी असलेला कनेक्ट वाढवायला हवा. इतर देशांप्रमाणे भारताला देखील मंदीचा झटका सहन करावा लागणार आहे.

त्यामुळे सध्या जगातील परिस्थितीचा विचार करून निर्णय घेणे गरजेचे आहे. कोणीतरी तुम्हाला मार्गदर्शन करेल, याची वाट पाहत बसू नका.

यशस्वी झालेले व्यवसाय हे माणूस आणि त्याच्या सभोवताली असलेल्या पर्यावरणाशी संबंधित असतात हे विसरता कामा नये. असे मत व्यवसाय सल्लागार आर. आर. दासगुप्ता यांनी व्यक्त केले. तसेच

‘सेतू’ या नावाप्रमाणेच इतर नवउद्योजकांशी कनेक्ट करणारे ठरले. त्यामुळे या कार्यक्रमाचा उद्देश साध्य झाला आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक संकल्पना आंत्रप्रिनर्सला समजल्या.

त्याचा फायदा सहभागी झालेल्या स्टार्टअपला नक्की होर्इल. ‘कोरेको’ चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी,संजय सूर्यवंशी, यांनी असे मत व्यक्त केले.

इत्यादी नवउद्योजकांनी सहभाग घेतला -

1. वेंकटेश कौशिक, संस्थापक, निओ ॲग्रोफुड

2. निखिल कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक, टेकीगो सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड

3. आदित्य वाढोकर, संस्थापक, फ्लिगन सिस्टिम्स प्रा. लि.

4. लर्नकिज एडुटेनमेंट, सचिन पंडित

5. संकेत जीवने, संस्थापक, ग्रोललॉक यावर मार्गदर्शन केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT