कल्याणीनगर - कथक नृत्य सादर करताना आर्या जोशी आणि रूपल गुजराती.
कल्याणीनगर - कथक नृत्य सादर करताना आर्या जोशी आणि रूपल गुजराती. 
पुणे

शेरोशायरी, नृत्यांची स्पंदने अन्‌ रॅप साँगही

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘इसी मोहल्ले मे भागा करते थे, जो कभी नंगे पांव’ या काव्यातून लहानपणीचा आनंद आणि कार्पोरेट युगात हरवलेले तारुण्य तरुणाईच्या रचनांमधून व्यक्त झाले. त्याबरोबरच रॅप साँग, नृत्यांची स्पंदनेही या वेळी उमटली. 

कल्याणीनगर येथे ‘वन लिरिक- ओपन माइक’ या ‘अँड ऑल’ आणि ‘अनटोल्ड स्टोरीज’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाविद्यालयीन आणि विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या तरुणाईने काव्य आणि शेरोशायरीतून कल्पनांचे आविष्कार फुलवले. आयोजक देवांगिनी महापात्रा, सौम्या विळेकर या वेळी उपस्थित होत्या. नव्या आणि तरुण कवींसाठी एक मंच उपलब्ध करून द्यावा, या उद्देशाने हा उपक्रम सुरू केल्याचे महापात्रा यांनी सांगितले.

निखिल चौहान यांनी शेरोशायरी सादर करून, कार्यक्रमाची सुरुवात केली. अखिलेश म्हणतो, ‘सर झुकाये वो चल रहा, कांधो पे बस्ता था पर हसता बहोत था. बस्ते मे आज दो किताबे है, फिर भी ये बस्ता भारी है’ यासह त्याने रॅप साँग, प्रेमकविताही सादर केल्या. हृतिकने ‘इसी मोहल्ले मे भागा करते थे, जो कभी नंगे पांव’ म्हणत लहानपणीचा आनंद आणि मोठे झाल्यानंतर बदललेल्या स्थितीवर भाष्य केले. 

श्रृतीने माहिती तंत्रज्ञान कंपनीतील तरुणाईची व्यथा काव्यातून मांडली. ‘मोहब्बत हर कोई करता है पर धोका नही खाता... हर कोई आशिक शायर नही होता,’ या कवितेतून प्रेमाचा भावात्मक बंध जोडला. रुपल आणि आर्या यांनी कथक नृत्याविष्कार सादर केले. आनंदकुमार पाटील याने शेरोशायरी सादर केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT