Illegal liquor News Pune  sakal
पुणे

Illegal liquor News Pune : अवैध दारूसह २.८२ कोटींचा मुद्देमाल जप्त

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे जिल्ह्यातून गेल्या दोन महिन्यांत अवैध दारूसह दोन कोटी ८१ लाख ९१ हजार ३४९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे जिल्ह्यातून गेल्या दोन महिन्यांत अवैध दारूसह दोन कोटी ८१ लाख ९१ हजार ३४९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत विविध प्रकरणांत मिळून एकूण ४२६ गुन्हे दाखल केले असून, यामध्ये ४११ संशयितांना अटक केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती, वाहतूक व विक्रीवर आळा घालण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून, या पथकांनी एक जानेवारी २०२४ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत विविध ठिकाणी छापे टाकत ही कारवाई केली आहे.

या कारवाईत २० हजार ६७५ लिटर हातभट्टीची दारू, ७६१ लिटर देशी मद्य, १८ हजार २९५ लिटर विदेशी मद्य, १३८ लिटर बिअर व १ हजार ८२३ लिटर ताडीसह ३६ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईसाठी एकूण १४ नियमित व तीन विशेष पथके तयार केली आहेत. अवैध दारूची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT