पिंपरी, ता. २ ः पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत मोशी येथे पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर’ (पीआयईसीसी) आहे. वर्षाकाठी या ठिकाणी १५ प्रदर्शन होतात. मात्र, या केंद्राचा योग्य विस्तार होत नसल्याने अद्याप नव्याने प्रदर्शन होत नाहीत. त्यामुळे आता या केंद्राचा आराखड्यानुसार नव्याने प्रकल्प उभारणीसाठी प्रशासकीय प्रक्रीया पूर्ण करण्याचे निर्देश पीएमआरडीए आयुक्तांनी दिले.
मोशी येथे ९४.८७ हेक्टर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेले हे केंद्र जागतिक दर्जाच्या मानकांनुसार विकसित करण्यात येत आहेत. आयुक्त डॉ. चौधरी यांनी तेथे असलेल्या ‘व्हीआयपी’ विश्रांतीकक्ष, स्वच्छतागृहे तसेच प्रदर्शनस्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. येथील प्रलंबित देखभाल-दुरुस्तीची कामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. तसेच, प्रदर्शनादरम्यान येणाऱ्या नागरिकांच्या आणि उपस्थितांच्या सुरक्षेचा विचार करता परिसरात अतिरिक्त सुरक्षारक्षक तैनात करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. हे केंद्र जागतिक दर्जाच्या मानकांनुसार विकसित करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याच्या सूचना त्यांनी पीएमआरडीएच्या लँड मॉनिटायझेशन सेलला दिल्या.
असे आहे केंद्र
- खुल्या प्रदर्शन केंद्रासाठी आणि इतर सुविधांसाठी २०.११ हेक्टर क्षेत्र विकसित (एकूण ९४.८७ हेक्टर)
- व्यावसायिक भूखंडांसाठी ३२ हेक्टर क्षेत्र
- प्रस्तावित बांधकाम प्रदर्शन हॉल
- खुले प्रदर्शन केंद्र ९८,००० चौ. मी.
काय होणार
- प्रस्तावित अधिवेशन केंद्र (५,००० क्षमता)
- तीन प्रदर्शन हॉल (प्रत्येकी ३५,००० चौ. मी)
- संग्रहालय, अग्निशामक केंद्र, प्रशिक्षण केंद्र
- व्हीआयपी लाउंज, बस डेपो, बहुस्तरीय पार्किंग
- बिझनेस सेंटर, हेलिपॅड, मेट्रो स्टेशन
- लक्झरी आणि बजेट हॉटेल, निवासी सुविधा, वखार
- प्राथमिक शाळा, रुग्णालये
प्रकल्पाच्या पुढील टप्प्यातील उभारणी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलअंतर्गत केली जात आहे. या पीपीपी मॉडेलअंतर्गत सर्व प्रशासकीय व विकास प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
- डॉ. अभिजित चौधरी, आयुक्त, पीएमआरडीए
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.