pune progam sakal
पुणे

Pune: राष्ट्रीय सर्वेक्षण दिनानिमित्त औंध येथे प्रदर्शन व चर्चासत्र

लॅन्ड सर्व्हेईंग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सर विल्यम लॅम्बटन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वर्षीचा पुरस्कार डि.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.प्रविण गोर्डे यांना हा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र व शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

- बाबा तारे -------------------------

औंध- येथील विश्वेश्वरय्या स्किल ट्रेनिंग अकॅडमीच्या वतीने राष्ट्रीय सर्वेक्षण दिनानिमित्त जमीन मोजणी उपकरणांचे प्रदर्शन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.औंध येथील पंडित भीमसेन जोशी नाट्यगृहात सोमवारी(ता. १०) झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी अधीक्षक सर्वेअर एस. त्रिपाठी, अमृता कुलकर्णी, संतोष शिरसीकर, रविन्द्र पाटील, जयराम सुपेकर, डॉ प्रितम वंजारी, साईटेकचे संचालक सचिन खोत आदी उपस्थित होते. 'दिवसेंदिवस रुंदावत चाललेल्या पुणे महानगराच्या कक्षा आगामी काळात स्थापत्य अभियांत्रिकी, सर्वेअर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भरपूर रोजगार संधी उपलब्ध करून देतील' असा विश्वास उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुंभार यांनी व्यक्त केला.

दरम्यान , सर्वेअर क्षेत्रातील काही प्राध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुणे महानगरपालिकेमध्ये सहायक अतिक्रमण निरिक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल महेश जगदाळे,

आविष्कार दवणे, राहुल डोके या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी एस. त्रिपाठी यांनीही आपले विचार मांडले.विश्वेश्वरय्या संस्थेचे प्राचार्य पांडुरंग सुपेकर यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचालन करुन आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बनावट FIF, CBI नोटीस आणि Supreme Court ची कागदपत्रे... ज्येष्ठ नागरिकाची १.४७ कोटींची सायबर फसवणूक कशी झाली?

Latest Live Updates Marathi: पाच कोटींच्या खंडणीसाठी गुत्तेदाराचे अपहरण; मुख्य अभियंत्याच्या चालकासह चौघे जेरबंद

Privacy Risk : धक्कादायक खुलासा! मोबाईल, लॅपटॉप काही सेकंदांनी घेतोय सिक्रेट स्क्रीनशॉट; सुरक्षा धोक्यात, लगेच बंद करा 'ही' सेटिंग

तिन्ही फॉरमॅटमध्ये सलामीवीर कोण? वैभव सूर्यवंशी नाही तर दुसराच खेळाडू रोहितचा उत्तराधिकारी, सेहवागने सांगितलं नाव

अरे जा आता गप्प... T20 मुंबई लीगमध्ये राडा, बॉलरने मग काढला वचपा... VIDEO

SCROLL FOR NEXT