PMRDA sakal
पुणे

पुणे : गुंठेवारी कायद्यांतर्गत घरे नियमित करण्यास मुदतवाढ

गुंठेवारी कायद्यांतर्गत बांधकामे नियमित करण्यासाठी केवळ २१ अर्ज पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) दाखल झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

गुंठेवारी कायद्यांतर्गत बांधकामे नियमित करण्यासाठी केवळ २१ अर्ज पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) दाखल झाले आहेत.

पुणे - गुंठेवारी कायद्यांतर्गत बांधकामे नियमित करण्यासाठी केवळ २१ अर्ज पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) दाखल झाले आहेत. घरे अधिकृत करण्याच्या योजनेला अल्पसा प्रतिसाद मिळाल्याने या योजनेस आता ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय ‘पीएमआरडीए’ने घेतला आहे.

राज्य सरकारने गुंठेवारी अधिनियम २००१मध्ये अलीकडेच सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार ३१ डिसेंबर पूर्वीची बांधकामे नियमित करता येणार आहे. नोंदणीकृत वास्तुविशारद किंवा नोंदणीकृत स्थापत्य अभियंत्यामार्फत अर्ज दाखल करावे लागणार आहे. अनधिकृत बांधकामधारकांनी यासाठी सातबारा उतारा, स्ट्रक्‍चरल इंजिनिअरकडून स्थैर्य प्रमाणपत्र दाखला (स्टॅबिलिटी सर्टिफिकेट), तसेच ३१ डिसेंबर २०२० पूर्वीचे बांधकाम असल्याबाबतचा गुगल नकाशा व इतर कागदपत्रे सादर करावी लागणार आहे.

आकुर्डी येथील ‘पीएमआरडीए’च्या कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे, याठिकाणी नागरिकांना अर्ज करता येणार आहे. त्यासाठी ३१ मे ही अर्ज दाखल करण्यासाठीची शेवटची मुदत होती, अशी माहिती प्राधिकरणाचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.

‘पीएमआरडीए’च्या हद्दीत ७०० पेक्षा अधिक गावांचा समावेश होतो. पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील बांधकाम परवानगीचे अधिकार ‘पीएमआरडीए’कडे आहेत. या २३ गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली आहेत. मात्र, नियमितीकरणासाठी फक्त २१ अर्ज आले आहेत. त्यामुळे पुन्हा ही मुदतवाढ देण्याचा निर्णय ‘पीएमआरडीए’ने घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'T20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळाला, आता शुभमन गिल... ', पुजाराचे IPL 2026 साठी गुजरात टायटन्सबाबत मोठं भाकीत

Broiler Chicken : बॉयलर जिवंत कोंबड्यांना उच्चांकी दर; चिकनच्या दरात मोठी वाढ

Manchar News : कलमोडी प्रकल्पाच्या पाणी फेरनियोजनास राज्य शासनाची मान्यता; आंबेगाव व खेड तालुक्यातील ६,६२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

MSRTC : गारगोटी आगाराची १८ लाख कमाई; आदमापूर यात्रेसाठी सहा दिवसांत साडेपाचशे जादा फेऱ्या

Water Plant Negligence : अन्यथा कळंबा फिल्टर हाउसच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावू; नगरसेवकांचा इशारा, ‘बी वॉर्ड’ चे दुरवस्थेवर बोट

SCROLL FOR NEXT