Crime esakal
पुणे

Facebook Fraud : फेसबुकवर महिलांशी मैत्री करुन लाखोंची फसवणूक, विदेशी टोळीतील एकाला अटक

अमेरिका, लंडनमध्ये मी डॉक्टर किंवा पायलट आहे, अशी फेसबुकवर महिलांना फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवायची. चॅटिंग करून महिलेला मैत्रीच्या जाळ्यात ओढायचे.

सकाळ वृत्तसेवा

अमेरिका, लंडनमध्ये मी डॉक्टर किंवा पायलट आहे, अशी फेसबुकवर महिलांना फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवायची. चॅटिंग करून महिलेला मैत्रीच्या जाळ्यात ओढायचे.

पुणे - अमेरिका, लंडनमध्ये मी डॉक्टर किंवा पायलट आहे, अशी फेसबुकवर महिलांना फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवायची. चॅटिंग करून महिलेला मैत्रीच्या जाळ्यात ओढायचे. काही दिवसांनी ‘मी दागिने, मौल्यवान पार्सल पाठवीत आहे’, असे मोबाईलवर सांगायचे. त्यानंतर ते पार्सल कस्टम विभागाने पकडले आहे. ते सोडविण्यासाठी बँक खात्यात पैसे पाठवावे लागतील, असे सांगून लाखो रुपयांची फसवणूक करायची. अशा प्रकारे एका महिलेला ११ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या विदेशी टोळीतील आरोपीला सायबर पोलिसांना अटक केली.

रॉबिनहूड ओकोह (वय ३९, रा. एस. एफ. संत गृह, सुनील डेअरीजवळ, दिल्ली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेची ११ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पुणे सायबर पोलिस ठाणे यांच्यामार्फत करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीच्या इन्स्टाग्राम आयडी, व्हॉट्सअॅप क्रमांक आणि बँक खात्यांची माहिती घेतली. तांत्रिक तपास करुन आरोपीचा ठावठिकाणा हा दिल्ली येथील असल्याचे समोर आले. त्यानुसार आरोपी रॉबिनहूड ओकोह याला नवी दिल्लीतून अटक केली. या नायजेरीयन आरोपीकडून चार मोबाईल फोन, एक हार्डडिस्क, पेनड्राईव्ह, १५ सिमकार्ड आणि सात डेबिट कार्ड जप्त केले आहेत. लष्कर न्यायालयाने आरोपीला २८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त विजय पळसुले आणि पोलिस निरीक्षक मीनल सुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनुराधा भोसले, पोलिस अंमलदार राजकुमार जाबा, नवनाथ जाधव, बाबासाहेब कराळे, नीलेश लांडगे, सोनाली चव्हाण, संदेश कर्णे, शाहरुख शेख, नितीन चांदणे यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT