पुणे

आला पावसाळा : पुण्यात नालेसफाईचे आव्हान; फक्त 25% कामे पूर्ण

अविनाश पोफळे

कर्वेनगर : पावसाळा तोंडावर आला, तरी वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गतच्या प्रभाग क्रमांक 13, 31, आणि 32 मध्ये नालेसफाईची केवळ 25 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. ही कामे सुरू करण्यास उशीर झाल्याने महापालिका प्रशासनावर चौफेर टीका होत आहे. त्यामुळे आता वेळेत कामे पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. 
पावसाळ्यात पाणी साठणारी अनेक ठिकाणे या भागात आहेत. त्या ठिकाणी पाणी साचून जनजीवन विस्कळित होण्याचा प्रकार घडला, तर त्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहील. नालेसफाईच्या कामाचे टेंडर देण्यास उशीर केल्याने ही कामे सुरू करण्यास उशीर झाला आहे, असा आरोप नगरसेवकांनी केला आहे. 

"महापालिकेकडून नालेसफाईच्या कामाचे मुल्यांकन (डीएसआर) पूर्ण झालेले नाही. भांडवली बजेटची कामे सुरू झालेली नाहीत. नेहमीच्या देखभाल-दुरूस्तीसाठीच्या तरतुदीअंतर्गत नालेसफाईसाठी प्रत्येक प्रभागाला पाच लाख रुपये दिले आहेत. त्याअंतर्गतच ही कामे सुरू आहेत,'' असे नालेसफाई कामाचे समन्वयक राजेश फटाले यांनी सांगितले. 

नगरसेवक सुशील मेंगडे म्हणाले," ठेकेदारांना नालेसफाईची कामे उशिरा मिळाल्याने ती सुरू होण्यास उशीर झाला आहे. नाले अजून साफ झाले नाहीत. ही कामे लवकर पूर्ण करावीत.'' 
भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले,"महापालिकेने नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. परिसरात पावसाळ्यात पाणी साठण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. त्यांची नीट सफाई न झाल्यास त्याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागतील. पावसाळ्यात पाणी तुंबून काही प्रश्‍न निर्माण झाला, तर त्यास पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील.'' 
"नालेसफाईसाठी उशीर झाला असला, तरी महापालिका प्रशासनाकडून ती कामे पूर्ण करून घेण्यात येतील,'' असे नगरसेवक राजेश बराटे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Red Alert : राज्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट; २४ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार सरींचा अंदाज

आजचे राशिभविष्य - 22 जुलै 2026

Tomato Paratha: कधी खाल्लाय का टोमॅटो पराठा? 20 मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी आज नक्की ट्राय करा

NEET Protest: NEET पेपरफुटीवर राहुल गांधींचे मोदींच्या निवासस्थानासमोर आंदोलन; राहुल-प्रियांका गांधी ताब्यात

Khadakwasla Dam Water Storage : पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार! पानशेत धरण 69 टक्के भरले; खडकवासला साखळीत 'इतके' टीएमसी पाणी जमा, पाहा पाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT