संजय माताळे sakal
पुणे

Pune : शेतकऱ्याच्या धाडसाने वाचले पाचजणींचे प्राण; संजय माताळे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

जीवाची पर्वा न करता संजय माताळे यांनी पाण्यात उडी घेतली. तोपर्यंत राजेंद्र जोरी, कालिदास माताळे,शिवाजी माताळे, व रमेश भामे हे स्थानिक किनाऱ्याजवळ मदतीसाठी आले

निलेश बोरुडे

सिंहगड - गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत खडकवासला धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या व पाण्याचा अंदाज न आल्याने बुडालेल्या सात पैकी चार मुली व एक महिला अशा पाच जणींना एका धाडसी शेतकऱ्याच्या प्रसंगावधानामुळे जीवदान मिळाले आहे. संजय सिताराम माताळे (वय अंदाजे 60, रा. गोऱ्हे खुर्द ता. हवेली) असे त्या देवदूत बनून आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

सावडण्याच्या विधीसाठी आलेल्या संजय सिताराम माताळे यांना अचानक जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला. माताळे आवाजाच्या दिशेने पळत गेले असता त्यांना मुली पाण्यात बुडत असलेल्या दिसल्या.

जीवाची पर्वा न करता संजय माताळे यांनी पाण्यात उडी घेतली. तोपर्यंत राजेंद्र जोरी, कालिदास माताळे,शिवाजी माताळे, व रमेश भामे हे स्थानिक किनाऱ्याजवळ मदतीसाठी आले होते. संजय माताळे यांनी पाण्यात बुडून बेशुद्ध झालेल्या चार मुली व एका महिलेला एक-एक करुन पाण्याच्या कडेला आणले.

संजय माताळे हे बुडालेल्या एकेकीला कडेला आणत होते व राजेंद्र जोरी, कालिदास माताळे, शिवाजी माताळे व रमेश भामे हे त्यांच्या पोटातील पाणी बाहेर काढत होते. संजय माताळे यांनी धाडसाने पोहत पाचजणींना बाहेर काढले आणि इतरांनी प्रथमोपचार करुन तातडीने उपचारांसाठी खानापूर येथे दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत.

दुर्देवाने प्रयत्न करुनही दोन मुली संजय यांच्या हाताला न लागल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संजय माताळे यांना परिसरातील नागरिक व नातेवाईकांचे फोन येत असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

"ओरडण्याचा आवाज आला तसा मी पळालो आणि पाण्यात उडी घेतली. माझ्या मागे काही लोक मदतीसाठी आले होते. पाच जणींना मी बेशुद्ध अवस्थेत पाण्याबाहेर काढले व काठावर थांबलेल्यांकडे दिले.

दोघी माझ्या हाताला लागल्या नाहीत. मित्र, नातेवाईक खुप फोन करत आहेत. खुप चांगलं काम केलं असं म्हणत आहेत. डोळे भरुन येत आहेत." संजय सिताराम माताळे, गोऱ्हे खुर्द, ता. हवेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT