पुणे

पिसर्वे येथे साडेतीन एकर ऊस जळून खाक

CD

माळशिरस, ता. १७ : पिसर्वे (ता. पुरंदर) येथे महावितरणच्या लोंबकळणाऱ्या विद्युत तारांच्या घर्षणामुळे लागलेल्या भीषण आगीत शेतकरी शिवाजी मच्छिंद्र कोलते यांचा साडेतीन एकर ऊस जळून खाक झाला. या दुर्घटनेत शेतकऱ्याचे सुमारे १५ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, महावितरणच्या निष्काळजीपणाबद्दल ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
कोलते यांच्या शेतावरून गेलेल्या विद्युत तारा अनेक दिवसांपासून खाली झुकल्या होत्या. वाऱ्यामुळे या तारांचे घर्षण होऊन उसात ठिणग्या पडल्या आणि आग लागली. ग्रामस्थ आणि अग्निशामक दलाने अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. घटनेच्या वेळी महावितरणचे कर्मचारी बहिरवाल यांनी कळकाच्या साहाय्याने तारा बाजूला केल्याचे स्थानिकांनी सांगितले.
याबाबत राजेवाडीचे शाखा अभियंता जीवन ठोंबरे यांना कळवूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पीडित शेतकरी शिवाजी कोलते यांनी तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून तातडीने पंचनामा व नुकसानभरपाईची मागणी केली आहे. नुकसानभरपाई न मिळाल्यास पिसर्वे ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, परिसरातील धोकादायक तारांची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

02944

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Stock Limit: मिठाई विक्रेत्यांनो लक्ष द्या! साखर साठवणुकीचा नवा नियम, अतिरिक्त साठा ठेवल्यास कारवाई होणार, मर्यादा किती?

थलपती विजय यांचा दारूच्या गुणवत्तेबाबत मोठा निर्णय; अल्कोहोलचं प्रमाण तपासणार

देशात H1N1चा फैलाव; नवा स्ट्रेन की जुना विषाणू? ICMRने सांगितलं सत्य, वैज्ञानिकांनी दिली महत्त्वाची माहिती

Vivo V80 Lite: 10,000 mAh बॅटरीसह MediaTek प्रोसेसर अन् तगडा कॅमेरा; 3 सप्टेंबरला लाँच होतोय Vivoचा 5G स्मार्टफोन!

Marathi News Live Updates : वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT