light bill Sakal
पुणे

वीजबिल दुरुस्ती नंतर थकबाकीच्या ५०% रक्कम २०२० अखेरपर्यंत भरावी : औटी

महावितरण कंपनीच्या विरोधात तक्रार भरो आंदोलन व आक्रोश सभेत बाळासाहेब औटी बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

आळेफाटा : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ५०% सवलत योजनेखाली खरी सवलत मिळवण्यासाठी थकबाकी रक्कम भरण्यापूर्वी खरी थकबाकी रक्कम निश्चित करण्यासाठी राज्यातील प्रत्येक शेती पंप ग्राहकाने प्रथम वीजबिल दुरुस्तीसाठी तक्रार नोंदवावी व वीजबिल दुरुस्ती नंतरच खऱ्या थकबाकीच्या ५०% रक्कम २०२० अखेरपर्यंत भरावी, असे जाहीर आवाहन ग्राहक पंचायतीचे प्रांत संघटन मंत्री बाळासाहेब औटी यांनी राजुरी जुन्नर येथे दिले.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत जुन्नर तालुक्याच्या वतीने वीज बिलाच्या दुरुस्ती बाबतच्या मागण्यांसाठी महावितरण कंपनीच्या विरोधात तक्रार भरो आंदोलन व आक्रोश सभेत बाळासाहेब औटी बोलत होते. या आंदोलनाला पंचायत समितीचे माजी सभापती दीपक शेठ औटी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर सिन्नर तालुका अध्यक्ष जगन्नाथ खोकराळे राजुरी गावचे सरपंच प्रियाताई हाडवळे उपसरपंच ज्ञानेश्वर शेळके

महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता अमित भरते सहाय्यक अभियंता पवार ऊर्जा समिती प्रमुख संतोष नेहरकर आदी मान्यवर उपस्थित होते. बाळासाहेब औटी पुढे म्हणाले की गावोगावी वीज ग्राहकांचे मेळावे घेऊनकृषी पंपाचे सर्वेक्षण करावे त्याचबरोबर मिटर रिडींगमाने बिलिंग नसूनवाजवी ज्यादा आकरणी केली जात आहे.रीडिंग एजन्सीला घरी जाऊन सूचना देण्यात याव्यातराज्य सरकारने जाहीर केलेल्या ५० टक्के सवलत योजनेखाली ही सवलत मिळणे थकबाकी रक्कम करण्यापूर्वी खरी थकबाकी रक्कम निश्‍चित करण्यासाठी राज्यातील प्रत्येक शेती पम्प. ग्राहकाने प्रथम वीज बिले दुरुस्ती साठी तक्रार नोंदवावी व वीज बिल दुरुस्ती नंतरच खऱ्या थकबाकीचा ५०टक्के रक्कम मार्च २०२२ अखेरपर्यंत भरावी असे यावेळी औटी यांणी सांगीतले.

वीजबिल सवलत योजना राबविताना राज्यातील सर्व शेती पंप वीज ग्राहकांची थकित वीज बिले तपासली जातील सर्व वीज बिले दुरुस्त करण्यात येतील असे आश्वासन राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी संघटनांना दिले होते तसे परिपत्रक १५ फेब्रुवारी २०१९ रोजी जाहीर केले होते तथापि या प्रमाणे दुरुस्ती कंपनी स्वतः करणार नाही .हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रत्येक शेती पंप वीज ग्राहकांनी वैयक्तिक तक्रार दाखल करावी लागेल याची नोंद शेतकऱ्यांनी घेणे आवश्यक आहे.

यावेळी उपकार्यकारी अभियंता अमित भरते म्हणाले की राजुरी येथे आक्रोश सभेच्या निमित्ताने सर्वांची वीज बिले स्थल पहानी करून प्रत्यक्ष रीडिंग पाहून दुरुस्त केली जातील असे आश्वासनयांनी दिले यावेळी जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातून सुमारे ३०० ते ३५० वीज ग्राहकांचे समस्यांचे निराकरण करण्यात आले

यावेळी राजुरी गावचे सरपंच प्रियाताई हाडवळे ज्ञानेश्वर शेळके सभापती दिपक औटी, माजी उपसरपंच मोहन हाडवळे आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आभार अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांवर काही ठिकाणी वाहतूक मंदावली, नागरिकांची तारांबळ

हॅप्पी दिवाळी! दिपिका-रणवीरने लेक 'दुआ'सोबत पहिल्यांदाच शेअर केला फोटो....

शेवटच्या ओव्हरमध्ये ४ धावा अन् सामना टाय... BAN vs WI सामन्यात ड्रामा; थरारक सुपर ओव्हरमध्ये लागला निकाल

Deglur ZP Elections : ग्रामीण भागात मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची धामधूम; शेतकऱ्यांच्या प्रश्नांना बगल

PESA Candidates Disqualification : पेसा भरतीतील २३ उमेदवारांचे भवितव्य धोक्यात; दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कागदपत्रांची पूर्तता कशी करणार?

SCROLL FOR NEXT