pune farmer protest  sakal
पुणे

Pune : कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांवरील कारवाई प्रकरणी शेतकरी संतप्त

महापालिका आयुक्तांच्या आदेशाला अतिक्रमण विभाकडून केराची टोपली

सकाळ डिजिटल टीम

पुणे - महापालिका प्रशासनाने कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यावर केलेल्या कारवाई विरुद्ध आयुक्तांनी कारवाई मागे घेण्याचा शब्द दिल्यानंतर आंदोलन संपण्याच्या मार्गावर होते. मात्र आयुक्तांनी आदेश देऊन ही शेतकऱ्यांची वाहने सोडण्यात आले नाहीत,

अखेर अतिशय शांततेच्या मार्गाने सुरू असलेले बिघडले आणि महापालिकेच्या प्रवेशद्वारावरून उड्या मारत शेतकऱ्यांनी महापालिकेत धाव घेत प्रवेश द्वारा समोरच पुन्हा आंदोलन करण्यास सुरुवात केली." शेतकऱ्यांचा शेतमाल महापालिकांनी अडविला तर थेट मंत्रालयात शेतमाल विक्री करण्यासाठी आणु" असा इशारा रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी दिला.

बार्शी तालुक्यातील तावडी या गावतील शेतकरी 8 एप्रिल रोजी मांजरी भागातील ग्रामसेवक प्रशिक्षण जवळ परिसरात कांदा विक्री करीत होते. त्यावेळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई केली. शेतकऱ्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या.

त्याच्या निषेधार्थ रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर का आंदोलन करण्यात आले. यावेळी खोत यांनी कांदा विक्री करीत महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदविला.या मोर्चात शेतकऱ्यांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

दरम्यान, संघटनेच्या पदाधीकाऱ्यांनी आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. त्यावेळी आयुक्तांनी कारवाई मागे घेत असल्याचे स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देत त्यांना माल विक्री करण्यासाठी सहकार्य केले जाईल, असे सांगितले.

दरम्यान, आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर ही महापालिका अतिक्रमण विभागाने शेतकऱ्यांची जप्त केलेली वाहने सोडण्यास नकार दर्शविला.

त्यामुळे खोत व शेतकरी संतप्त झाले. त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावरून उड्या मारत शेतकऱ्यांनी महापालिकेत धाव घेत प्रवेशद्वारा समोरच पुन्हा आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्यांनतर खोत पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले.

खोत म्हणाले, " हे राज्य सरकार लोकांचे आहे, या पद्धतीने वागणार असेल तर शेतकरी मंत्रालयात येऊन शेतमालाची विक्री केली जाईल.

आयुक्तांनी आदेश देऊन ही तो सोडला नाही. माधव जगताप ज्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा कांदा अडविला, त्यांची चौकशी व्हावी. माधव जगताप या अधिकाऱ्याच्या संपत्तीची सरकारने चौकशी झाली पाहिजे. शेतकऱ्याची दंड लोकवरगणी करून भरू."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT