पुणे

फार्मर आयडीची ८८ टक्के नोंदणी

CD

पुणे, ता. १९ : जिल्ह्यात ॲग्रीस्टॅकअंतर्गत ८८.०२ टक्के शेतकरी नोंदणी (फार्मर आयडी) झाली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या १९ व्या हप्त्यानुसार सक्रिय असलेल्या चार लाख २४ हजार १३७ लाभार्थ्यांपैकी तीन लाख ७३ हजार ३०६ शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे, अजूनही ५० हजार ८३१ सक्रिय शेतकरी नोंदणीपासून दूर आहेत.

राज्यात कृषी विभागाच्या विविध योजना व अनुदानांचा लाभ पारदर्शक आणि प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. जिल्ह्यात पीएम किसानचे पाच लाख ७६ हजार २७९ लाभार्थी आहेत. लाभार्थ्यांपैकी चार लाख ३१ हजार २३३ शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. यामध्ये तीन लाख ७३ हजार ३०६ सक्रिय लाभार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण लाभार्थ्यांच्या तुलनेत नोंदणीचे प्रमाण ७४.८३ टक्के आहे. सक्रिय लाभार्थ्यांच्या नोंदणीत पुरंदर तालुका जिल्ह्यात आघाडीवर आहे. तेथे ९३.२१ टक्के शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. दौंडमध्ये ९२.९९ टक्के नोंदणी झाली आहे. त्यापाठोपाठ इंदापूरमध्ये ९०.६८, बारामतीमध्ये ८९.१७ आणि शिरूरमध्ये ८८.९४ टक्के नोंदणी झाली आहे. जुन्नरमध्ये ८७.७७, आंबेगावमध्ये ८६.९३, भोरमध्ये ८५.७८ आणि खेडमध्ये ८३.९४ टक्के सक्रिय लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. ही नोंदणी महत्त्वाची असल्याने शेतकऱ्यांनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


नोंदणी बाकी असलेले लाभार्थी तालुकानिहाय :
खेड - ७,०३१
जुन्नर - ६,२९१
शिरूर - ५,५७६
बारामती - ५,१४९
आंबेगाव - ४,८३८
इंदापूर - ४,३६७
मावळ - ३,५०५
भोर - ३,४५४
दौंड - २,९०६
पुरंदर - २,१३०
मुळशी - २,१११
हवेली - १,८१३
राजगड - १,७६०
एकूण - ५०,८३१


दृष्टिक्षेपात...
एकूण पीएम-किसान लाभार्थी : ५ लाख ७६ हजार २७९
सक्रिय लाभार्थी : ४ लाख २४ हजार १३७
फार्मर आयडी पूर्ण : ४ लाख ३१ हजार २३३
सक्रिय लाभार्थ्यांपैकी नोंदणी बाकी : ५० हजार ८३१
एकूण लाभार्थ्यांच्या तुलनेत नोंदणी : ७४.८३ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचं ठरलं! मुंबईत नव्हे अंतरवालीतच!! निर्णय का बदलला? अचानक मुंबईत जाण्याची शक्यता

Mumbai News : झेडपीच्या प्रश्नांवर तोडगा; आरोग्य केंद्र आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Marathi News Live Updates : पारोळ्यात रेशनचा माल काळ्याबाजारात विक्रीचा प्रयत्न फसला

Hiwarkhed Accident : पत्रकार किशोर खडे यांचा अपघातात मृत्यू; हिवरखेड-सोनाळा मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

SCROLL FOR NEXT