farmer suicide sakal
पुणे

Pune : बोगस कर्जाच्या वसुलीच्या जाचाला कंटाळून बाभुळसर येथील शेतकऱ्याची आत्महत्या

जिल्हा बँकेच्या तत्कालीन अधिकारी, सोसायटीचे सचिव अशा सात जणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

मांडवगण फराटा : पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे तत्कालीन अधिकारी, बाभूळसर बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे तत्कालीन सचिव व संचालक मंडळ यांनी शेतकऱ्याच्या नावावर बोगस कर्ज दाखवुन फसवणूक केली व या बोगस कर्जाच्या वसुलीसाठी त्रास दिल्याने या जाचाला कंटाळून शहाजी ज्ञानदेव मचाले (वय-६५) (रा. बाभूळसर बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे ) या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.

बाभूळसर बुद्रुक (ता. शिरुर) येथे सोमवारी (दि. २० ) रोजी ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेची फिर्याद मृत शेतकऱ्याचे पुतणे गणेश तान्हाजी मचाले (वय-४४) यांनी दाखल केली आहे.

मांडवगण फराटा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहाजी ज्ञानदेव मचाले यांनी सोमवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या घरासमोरील झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटनेबाबत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी १) नवनाथ चंद्रकांत फराटे २) बाळासो बबन फराटे दोघेही रा. मांडवगण फराटा ता. शिरुर जि. पुणे तसेच ३) मच्छिंद्र सुखदेव संकपाळ रा. आंबळे ता. शिरुर जि. पुणे ४) अनिल सुभाष लोहार रा. न्हावरा ता.

शिरुर जि.पुणे ५) अर्जुन प्रल्हाद जगताप रा. तांदळी ता. शिरुर जि. पुणे ६) विजय सोपान नागवडे रा.बाभूळसर ता. शिरुर जि. पुणे ७) विजय चव्हाण रा. पारगाव ता. दौंड जि. पुणे व बाभूळसर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे तत्कालीन संचालक मंडळ यांच्यावर सदर शेतकऱ्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप यादव, सहाय्यक फौजदार राजेंद्र साबळे, प्रल्हाद जगताप, पोलीस नाईक संपत खबाले, पोलिस नाईक अमोल गवळी, ठाणे अंमलदार योगेश गुंड, कॉन्स्टेबल राजाराम गायकवाड, उमेश जायपत्रे,भाऊसाहेब टेंगले हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहली, शुभमन गिलचे शतक, टीम इंडियाचा पहिल्या वन डेत दणदणीत विजय; मालिकेत आघाडी

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

SCROLL FOR NEXT