पुणे

परदेशी शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याची शेतकऱ्यांना संधी

CD

पुणे, ता. ९ : परदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी आता पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. युरोप आणि चीनच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना दौऱ्याच्या खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. या अभ्यास दौऱ्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी २२ ऑगस्टपर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.

युरोप दौऱ्यात फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि दुग्धोत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करता येणार आहे. चीन दौऱ्यात विविध कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती तसेच कृषी प्रदर्शनांची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. परदेशातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा केलेला वापर, त्यातून उत्पादन व उत्पन्नात झालेली वाढ याचा प्रत्यक्ष अनुभव या दौऱ्यातून मिळणार आहे. शेतीमालाची गुणवत्ता वाढविण्यासह उत्पादनवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. जगभरात शेतीशी संबंधित तंत्रज्ञानात सातत्याने बदल होत आहेत. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या गरजेनुसार योग्य वेळी त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने कृषी विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हे परदेशी अभ्यास दौरे आयोजित करण्यात येणार आहेत, असेही काचोळे यांनी सांगितले.


अर्धा खर्च शासनाकडून
अभ्यास दौऱ्याच्या एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त दोन लाख रुपये यापैकी कमी असलेली रक्कम शासनाकडून अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. लाभार्थी शेतकऱ्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले असणे आवश्यक आहे. निवड झाल्यानंतर दौऱ्याची तारीख निश्चित होऊन कृषी विभागाकडून निवडीचे पत्र मिळाल्यानंतर, अनुदानाची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम प्रवासी कंपनीकडे आगाऊ जमा करणे बंधनकारक असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banking Update: बँका रविवारी सुरू, सोमवारी बंद! कारण काय? पुढच्या आठवड्यात कोणत्या दिवशी व्यवहार करता येणार?

ऑक्टोबरमध्ये येणार १०० टक्के इथेनॉलवर चालणारी कार, पेट्रोलचा खर्च फक्त २५ रुपये लीटर; गडकरींचा मोठा दावा

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २६ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ - मराठी राशी भविष्य

Aditya Thackeray : हे सरकार निर्दयी! आदित्य ठाकरे यांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT