AI-enabled traffic cameras on Pune's FC Road now detect and fine vehicles in real-time for even a minute’s illegal halt, ensuring zero-tolerance enforcement.  esakal
पुणे

Pune FC Road Traffic: पुण्यातील 'FC'रोडवर एक मिनिट जरी तुम्ही वाहन उभा करून थांबलात, तर लगेच...

What Is Happening on Pune FC Road? : जाणून घ्या, नेमकी काय घडली आहे घटना आणि काय होवू शकतं?

Mayur Ratnaparkhe

Pune FC Road Vehicle Fine: पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेज रोडवरील वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी एआय आधारित कॅमेरे बसवले गेले आहेत. आता या एआय कॅमेऱ्यांद्वारे जारी झालेल्या वाहतूक चलानमुळे स्वयंचलित अंमलबजावणी आणि वाहतूक नियमांनुसार अडथळ्यांची व्याख्या यावरून वाद सुरू झाला आहे.   

१४ जुलै रोजी जारी केलेल्या चालानमध्ये, पिवळ्या रेषेवर उभ्या असलेल्या वाहनाचा उल्लेख करण्यात आला होता आणि वाहतुकीस अडथळा आणल्याबद्दल ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. या दंडाला रस्त्याच्या कडेला बसवलेल्या एआय-आधारित कॅमेऱ्यांमधील फोटोंचाही आधार घेण्यात आला. तर वाहन मालकाने नियमाचे उल्लंघन झाल्याच्या आरोपाला आव्हान देत म्हटले, की वाहन थोड्या काळासाठी थांबले होते आणि वाहतुकीला अडथळा आणत नव्हते.

या घटनेनंतर, पुणे वाहतूक पोलिसांनी २१ जुलै रोजी स्पष्टीकरण जारी केले, ज्यामध्ये म्हटले होते की एफसी रोड हा नो-पार्किंग आणि नो-हाल्टिंग झोन आहे. वाहतूक अधिकाऱ्यांच्या मते, ६० सेकंदांपेक्षा जास्त काळ थांबलेले कोणतेही वाहन कारवाईस पात्र आहे. एआय कॅमेऱ्यांची यंत्रणा अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना आपोआप शोधण्यासाठी आणि दंड ठोठवण्यासाठी तयार केलेली आहे.

स्पष्टीकरणात पुढे असे अधोरेखित केले आहे की, एआय प्रणाली अंमलबजावणी कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि उच्च-वाहतूक क्षेत्रांचे निरीक्षण करण्यात मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.

या घटनेमुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत, काही युजर्सनी कायदेशीर मार्ग सुचवला आहे, तर काहींनी एआय प्रणालीच्या कॅलिब्रेशन आणि अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर एका ग्रुपने चक्क वाहतूक कर्मचाऱ्यांवरच एआय-आधारित देखरेखीची मागणी केली आहे, तर काहींनी कठोर अंमलबजावणीच्या तुलनेत रस्त्यांच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

वाहन मालकाने चालानच्या रिव्ह्यूसाठी औपचारिक अपील सादर केले आहे.  ज्यामध्ये अडथळा आणल्याच्या दाव्याला विरोध करण्यासाठी काही पुरावे जोडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: ''...तर धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपदाची संधी देऊ'', अजित पवारांनी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं

CJI BR Gavai Retirement Plan: सरन्यायाधीश बी.आर.गवईंनी सांगितला 'रिटायरमेंट' नंतरचा प्लॅन, म्हणाले 'मी कोणतंही...'

Student Video: बोटांमध्ये चावी फिरवत वर्गातून बाहेर पडली, नंतर थेट मुलीनं शाळेत चौथ्या मजल्यावरून उडी मारली, पाहा थरारक व्हिडिओ

IND vs ENG 4th Test: 'Root' मजबूत! जो रूटचे ३८वे शतक; भारतीय गोलंदाजांची घेतली शाळा, मोडले अनेक विक्रम

Latest Maharashtra News Updates : माणिकराव कोकाटे यांच्या समर्थनार्थ सिन्नरमध्ये शक्तीप्रदर्शन

SCROLL FOR NEXT