Pune FC Road bar Drugs Case Three boys spent 85 thousand rupees in night Latest update  
पुणे

Pune Drugs Case : ‘त्या’ तिघांनी रात्रीत उधळले ८५ हजार! फर्ग्युसन रोडवरील एल थ्रीममधील प्रकार; पार्टीमध्ये अल्पवयीन मुले?

Pune Drugs Case Latest News : बारमध्ये अमली पदार्थांचे सेवन करणारे तरुण मध्यरात्री पाठीमागील दरवाजाने पबमध्ये शिरले. पबमध्ये येण्यापूर्वी त्यांनी पार्टी केल्याची माहिती चौकशीत मिळाली आहे.

सनिल गाडेकर

पुणे, ता. २५ : नामदार गोपाळकृष्ण गोखले पथावर (फर्ग्युसन महाविद्यालय) असलेल्या लिक्विड लेझर लाउंज (एल थ्री) या बारमध्ये अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आता ‘त्या’ मुलांचा शोध सुरू केला आहे. त्यांनी एका रात्रीत ८० ते ८५ हजार रुपये उडवल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. रविवारी रात्रभर झालेल्या पार्टीत काही अल्पवयीन मुले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

बारमध्ये अमली पदार्थांचे सेवन करणारे तरुण मध्यरात्री पाठीमागील दरवाजाने पबमध्ये शिरले. पबमध्ये येण्यापूर्वी त्यांनी पार्टी केल्याची माहिती चौकशीत मिळाली आहे. बारमधील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बारमधील प्रसाधनगृहात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार कारवाई करत बारचे मालक, चालक, व्यवस्थापकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. यासह तेथील कर्मचाऱ्यांना देखील अटक करण्यात आली आहे. रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल माने, सहायक निरीक्षक दिनेश पाटील यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले.

पार्टीला उपस्थित असणाऱ्या ४० ते ४५ मुलांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. अमली पदार्थ सेवन करणाऱ्या तरुणांनी त्या रात्री ८० ते ८५ हजार रुपयांचा खर्च केल्याची माहिती मिळाली आहे. पबमध्ये काही अल्पवयीन मुले असल्याची शक्यता आहे. त्या रात्री पबमध्ये असलेल्या ४० ते ४५ तरुणांची चौकशी सुरू करण्यात आली असून, त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. - संदीपसिंग गिल, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Salary Hike : आठवा वेतन आयोग लागू झाल्यास फरक मिळणार? कोणाला किती पगार वाढणार जाणून घ्या आकडेवारी

SRH vs PBKS Live: अभिषेक शर्माची क्रांती! IPL मध्ये कोणालाच न जमलेला पराक्रम केला; वैभव सूर्यवंशी या विक्रमात पाचव्या क्रमांकावर

Yuzvendra Chahal पुन्हा वादात! कार चालवत असतानाच रस्त्यात फेकली सिगारेट अन् मग... Video Viral

अपडेटनंतर मोबाईल होत आहेत निकामी; सतत हँग होऊन अनेक अडचणी; ग्राहक चिंतेत, पाहा तुमच्याकडे 'हा' फोन आहे का?

Nashik child death accident : खेळता खेळता पाण्याच्या टाकीत डोकावला अन्... नको तेचं घडलं, १८ महिन्यांच्या शौर्यचा करून अंत

SCROLL FOR NEXT