pune terrorist sakal
पुणे

Pune : दहशतवादी प्रकरणात ‘एटीएस’कडून पुण्यात पाचव्या आरोपीला अटक

संवेदनशील स्थळांची छायाचित्रे आणि लॅपटॉमधून पाचशे जीबी डेटा हस्तगत केला होता.

सकाळ डिजिटल टीम

पुणे - कोथरूडमधून अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून राज्य दहशतवादीविरोधी पथकाने(एटीएस) मंगळवारी (ता. १) आणखी एका आरोपीला अटक केली. या प्रकरणात यापूर्वी चारजणांना अटक करण्यात आली आहे.

झुल्फिकार अली बडोदावाला (रा. पडघा, ठाणे) असे अटक केलेल्या पाचव्या आरोपीचे नाव आहे. तो राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कोठडीत होता. न्यायालयाची परवानगी घेऊन त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

पुणे पोलिसांनी १८ जुलै रोजी महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान (वय २३) आणि महम्मद युसूफ महम्मद याकूब साकी (वय २४, दोघेही रा. चेतना गार्डन, मिठानगर, कोंढवा) या दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. मध्यप्रदेशच्या रतलाममधील मूळ रहिवासी असलेले हे दोघे जयपूर बॉम्बस्फोट कटातील फरार आरोपी आहेत.

‘एटीएस’ने यापूर्वी दहशतवाद्यांच्या कोंढव्यातील घरातून ड्रोन, संवेदनशील स्थळांची छायाचित्रे आणि लॅपटॉमधून पाचशे जीबी डेटा हस्तगत केला होता. त्यानंतर ‘एटीएस’ने तपासादरम्यान दोन दहशतवाद्यांकडून बॉम्ब तयार करण्याचे रसायन आणि प्रयोगशाळेतील उपकरणे जप्त केली आहेत.

दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय ३२, रा, कोंढवा) आणि आर्थिक रसद पुरविणाऱ्या सिमाब नसरुद्दीन काझी (वय २७, रा. कोंढवा) या दोघांना अटक केली होती. त्यानंतर आता झुल्फिकार बडोदावाला याला अटक झाली आहे.

पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांचे इसिस ‘कनेक्शन’?

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) २८ जून २०२३ रोजी इसिस दहशतवादी संघटनेच्या इशाऱ्यावर कारवाया केल्याप्रकरणी चार आरोपींना अटक केली होती. त्यात झुल्फिकार अली बडोदावाला याचा समावेश होता.

‘एनआयए’ने महाराष्ट्र इसिस मॉड्यूलप्रकरणी डॉ. अदनान अली सरकार याला कोंढव्यातून नुकतीच अटक केली होती. झुल्फिकार हा अदनान अली याचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. त्यावरून पुण्यात पकडलेले दहशतवादी आणि इसिसचे ‘कनेक्शन’ असल्याचा संशय बळावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Pattern : एमपीएससी प्रश्नपत्रिकांची सुरक्षितता अन् वेळापत्रक बदलणार? कृती दलाचे सदस्य डॉ. प्रवीण गेडाम अंतिम अहवालाबाबत नेमके काय म्हणाले?

Asia Cup 2026: BCCI ने सांगितलं अन् टीम इंडियाने केलं! मोहसिन नक्वींच्या हातून ट्रॉफी न घेण्यावर कोच मुजुमदार यांचं स्पष्ट उत्तर

Maharashtra ST: एसटी प्रवाशांसाठी मोठी गुड न्यूज! ताफ्यात येणार ५ हजार नव्या ‘लालपरी’; ‘टाटा मोटर्स’ची निविदेत बाजी

“रुबाब आहे!” कोकणच्या निसर्गात रमली ‘सनई चौघडे’ फेम शर्वरी; म्हणाली...“मी जवळजवळ स्वर्गात…”

Marathi News Live Updates : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी; अमित शाहांसह उद्धव ठाकरे आज बाप्पाचं घेणार दर्शन

SCROLL FOR NEXT