Video Viral  Sakal
पुणे

Pune News : पुण्यात बैलांची भररस्त्यात झुंड; नागरिकांची पळापळ, दुचाकींचे नुकसान

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुणे शहरात भर रस्त्यात दोन बैलांची झुंड लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चांगलीच घाबरगुंडी उडाली असून अनेक दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली. पुणे शहरातील वडगाव शेरी येथे ही घडना घडली असून याप्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, बैलांचा हा धुमाकूळ बराच वेळ सुरू होता. त्यामुळे तर अनेक वाहन चालक वाहन सोडून पळाले असून अनेक दुकानदारांनी आपली दुकाने बंद केल्याचे प्रकार घडले. रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकींना धक्का लागून दुचाकी रस्त्यावर पडल्यामुळे काही दुचाकींचे किरकोळ नुकसानही झाल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे शहरातील मोकाट जणावरांच्या त्रासामुळे काही नागरिकांनी पुणे महापालिकेकडे तक्रार केल्याचे प्रकार याआधी झाले होते. त्यानंतर महापालिकेकडून यावर कारवाई केली होती. बैलाच्या झुंडीच्या या प्रकरणानंतरही नागरिकांकडून या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: विराट कोहली ODI मालिकेसाठी भारतात पोहचला, विमानतळावरील Video Viral; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

Pune Ganpati Visarjan : आवाजाची मर्यादा ओलांडल्यास ढोल-ताशा पथकांवर होणार कारवाई; १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण

Ausa News : मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला शेतकऱ्याने जीवन संपविल्याने लागले गालबोट; करपलेले सोयाबीन पाहून शेतकऱ्याने गमावला जीव

Marathi News Live Updates : आदित्य ठाकरेंकडून कायदेशीर नोटिसीला उत्तर, सतीश सालियन यांचे आरोप फेटाळले

Rare Albino Snake : काळा नाहीतर चक्क पांढराशुभ्र! सिंधुदुर्गातील पावशीत आढळला अत्यंत दुर्मीळ विषारी 'अल्बिनो मण्यार'; गुळगुळीत शरीर अन्.. काय आहे खासियत?

SCROLL FOR NEXT