Pune Crime News sakal
पुणे

Pune Crime News: फायनान्स कंपनीच्या मॅनेजरच्या जाचाला कंटाळून 'त्याने' संपविले जीवन

किरकटवाडी येथील तरुणाच्या आत्महत्येचे गुढ उलगडण्यात हवेली पोलीसांना यश; मॅनेजर अटकेत

निलेश बोरुडे

किरकटवाडी : खासगी फायनान्स कंपनीत रिकव्हरीचे काम करणाऱ्या उत्तम सखाराम धिंडले (वय 27 रा. भैरवनाथ नगर, किरकटवाडी ता. हवेली) या नवविवाहित तरुणाने दि. 13 फेब्रुवारी रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

आत्महत्येपूर्वी उत्तमने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीच्या आधारे हवेली पोलीसांनी संबंधित फायनान्स कंपनीचा मॅनेजर अमन खुराना (वय 24) याला विमाननगर येथून अटक केली आहे.

' आई, भाऊ, पत्नी या सर्वांची मी माफी मागतो. आता मी सर्वांना सोडून जात आहे. मला अमन खुराना यांनी खुप त्रास दिला. वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी शिवीगाळ करायचे. अमन खुराना यांच्या त्रासामुळे काही कस्टमरचे पैसे मी स्वतः भरले परंतु कस्टमरने मला पैसे दिले नाहीत.

अमन खुराना यांनी मला सहन करण्याच्या पलीकडे त्रास दिला. माझ्या मृत्यूला सर्वस्वी तेच जबाबदार आहेत. माझे दोघंही भाऊ देवासारखे आहेत. आईची काळजी घ्या. मी गेल्याचे आई आणि पत्नीला लवकर सांगू नका', असा धक्कादायक मजकूर उत्तमने मृत्यूपूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवला आहे.

मिळालेल्या चिठ्ठीच्या आधारे तपास करुन पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, पोलीस नाईक संतोष भापकर यांनी संबंधित फायनान्स कंपनीचा मॅनेजर अमन खुराना याला विमाननगर येथून अटक केली आहे.

मॅनेजरच्या जाचामुळे उत्तमचा जीव गेला, किमान इतरांना असा त्रास होऊ नये म्हणून अमन खुराना याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी उत्तमचे कुटुंबीय व नातेवाईकांनी केली आहे. पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार याबाबत अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT