सेवा विकास सहकारी बँक sakal
पुणे

सेवा विकास सहकारी बँकेवर आर्थिक निर्बंध

सुमारे एक लाख ठेवीदार अडचणीत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : रिझर्व्ह बॅंकेकडून येथील सेवा विकास सहकारी बँकेवर १२ ऑक्टोबरपासून आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यानुसार खातेदार- ठेवीदारांना एक हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढता येणार नाही.

बँकिंग नियमन अधिनियमाच्या १९४९ च्या कलम ३५ अ अंतर्गत सेवा विकास सहकारी बँकेला हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. रिझर्व्ह बॅंकेच्या पूर्व परवानगीशिवाय सेवा विकास बॅंकेला कोणत्याही ठेवी, कर्जाचे नूतनीकरण करण्यात येणार नाही. कोणतीही गुंतवणूक करता येणार नाही. तसेच, नवीन ठेवी स्वीकारता किंवा वितरित करता येणार नाहीत.

रिझर्व्ह बॅंकेच्या पूर्वपरवानगीशिवाय त्याच्या कोणत्याही मालमत्ता किंवा मालमत्तेची विक्री, हस्तांतरण करता येणार नाही. विशेषतः सर्व बचत बँक किंवा चालू खात्यांमध्ये किंवा ठेवीदारांच्या इतर कोणत्याही खात्यातून केवळ एक हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशानुसार अटींच्या अधीन राहून काढण्याची रक्कम काढण्याची परवानगी दिली जाऊ शकते.

रिझर्व्ह बॅंकेने बँकिंग परवाना रद्द केलेला नाही. आर्थिक स्थिती सुधारत नाही तोपर्यंत बँक निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय करीत राहील. परिस्थितीनुसार रिझर्व्ह बँक या निर्देशांमध्ये बदल करण्याचा विचार करू शकते. हे निर्देश १२ ऑक्टोबर २०२१ रोजी व्यवसाय बंद झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागू राहतील.

एक लाख ठेवीदार अडचणीत

सेवा विकास सहकारी बँकेचे मुख्यालय पिंपरीत आहे. या बॅंकेच्या २५ शाखा असून, सुमारे एक लाख ठेवीदार आहेत. या वर्षी जूनमध्ये, रिझर्व्ह बँकेने ठेवीदारांकडून अनेक खटले दाखल केल्यानंतर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती.

४२९ कोटींच्या कर्जात अनियमितता

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) लेखापरीक्षकांनी सेवा विकास बँकेच्या व्यवहारांचा तपास केला आहे. त्यामध्ये ४२९ कोटी रुपयांच्या कर्ज वितरणामध्ये कथित अनियमितता आढळून आली आहे. या प्रकरणात दाखल झालेल्या प्रकरणांपैकी चार जण अटकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Crime : प्रेयसीसाठी मृतदेहाची लावली विल्हेवाट? हाडांच्या तुकड्यांनी उघड केलं 4 लाखांच्या बदल्याचं भयंकर गुपित, मुंबईतील महिलेला अटक

'ते ज्येष्ठ आहेत म्हणून मी घाबरलं पाहिजे असं...' प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांबद्दल बोलताना म्हणाली...'मी कोणालाच घाबरत...'

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावरील शिवसमाधी परिसरात लावलेला अनधिकृत बोर्ड रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी काढून टाकला

College Student Death : शिक्षणाला कंटाळून सावंतवाडीत 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गॅलरीतून उडी मारून संपवलं आयुष्य; चिठ्ठीतील मजकुराने उडाली खळबळ

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

SCROLL FOR NEXT