Pune FIR Filed against Former MLA Harshvardhan Jadhav and Isha Jha charged for attempted of murder 
पुणे

ह्रदय शस्त्रक्रिया झाल्याचे सांगूनही माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली वृद्धास बेदम मारहाण; गुन्हा दाखल 

सकाळवृत्तसेवा

पुणे : रस्त्यावर थांबलेल्या कारचा अचानक दरवाजा उघडल्यामुळे दुचाकीवरुन जाणारे दाम्पत्य खाली पडून त्यांना दुखापत झाली. याबाबतचा जाब विचारणाऱ्या वृद्ध दाम्पत्यास कारमध्ये बसलेल्या माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह एका महिलेने वृद्ध पती-पत्नीस बेदम मारहाण केली. ह्रदयाची शस्त्रक्रिया झाल्याचे सांगूनही जाधव यांनी वृद्धाला लाथाबुक्‍यांनी मारहाण केली. ही घटना सोमवारी सकाळी सात वाजता औंध येथे घडली. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी दोघाघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन जाधव यांना ताब्यात घेतले आहे. 

हर्षवर्धन रायभान जाधव (वय 43, रा. बालेवाडी, ईषा बालाकांत झा (वय 37, रा. वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे. जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अमन अजय चड्डा (वय.28,रा. बोपोडी) यांनी फिर्याद दिली आहे. जाधव हे कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजय चड्डा हे व्यावसायिक आहेत.

चड्डा यांचे आई-वडील सोमवारी सकाळी सात वाजता दवाखान्यात जाण्यासाठी त्यांच्या दुचाकीवरुन औंध येथील ब्रेमन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जात होते. त्यावेळी रस्त्यात थांबलेल्या एका कारचा अचानक दरवाजा उघडण्यात आला. त्यामुळे फिर्यादीचे आई-वडील खाली पडले. फिर्यादीच्या आई ममता चड्डा (वय 48) यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे फिर्यादीच्या वडीलांना कारचालविणाऱ्या जाधव यांना याबाबत जाब विचारला. त्याचा राग आल्याने जाधव व फिर्यादीचे वडील यांच्यात वाद सुरू झाले. त्याचवेळी जाधव यांनी फिर्यादी यांना लाथाबुक्‍क्‍यांनी जबर मारहाण केली.

आपल्या ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली आहे, त्यामुळे मारु नये, अशी फिर्यादीच्या वडीलांनी जाधव यांच्याकडे विनवणी केली. तरीही जाधव यांनी त्यांच्या छातीत व पोटात लाथाबुक्‍क्‍या मारल्या. त्याचबरोबर फिर्यादी यांच्या आईलाही लाथ मारुन जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या जिवीतास धोका निर्माण केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. जखमी दाम्पत्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र दहीफळे करीत आहेत. 
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: मुंबईत राजकीय भूकंप! बीएमसी निवडणुकीच्या रणांगणात काँग्रेसची मोठी खेळी; मविआची एकजूट ढासळली

India's T20 WC 2026 Schedule : संघ जाहीर झाला आता भारताचं वेळापत्रक नोट करा! पहिला सामना अमेरिकेशी नंतर पाकिस्तानशी भिडणार...

Latest Marathi News Live Update: मुंबई पालिकेतील मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून राजकीय वाद पुन्हा चिघळला!

Dhule News : धुळे राष्ट्रवादीचे जहाज 'विना कॅप्टन'; शहराध्यक्षाविना निवडणुकीच्या रिंगणात कशी टिकणार फौज?

Jaysingpur Farmer : ऊसपट्ट्यातच चाऱ्याचा दुष्काळ; शिरोळमध्ये वाड्यासाठी शेकड्याला २०० रुपये

SCROLL FOR NEXT