Fire accident sakal
पुणे

Pune Fire : कोंढव्यात एमएनजीएलच्या वाहिनीला आग

साळुंके विहार रस्त्यावरील घटना, गॅस पुरवठा काही काळ बंद

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोंढव्यातील साळुंके विहार रस्त्यावर असलेल्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या (एमएनजीएल) वाहिनीतून गॅसगळती होऊन आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी ती आटोक्यात आणली. आगीमुळे कोणतीही मोठी दुर्घटना होवू नये म्हणून साळुंके विहार परिसरातील गॅस पुरवठा काही काळ बंद ठेवण्यात आला होता.

आगीची घटना ज्या ठिकाणी घडली तेथेच एक पार्क करण्यात आली होती. आगीची झळ लागल्याने तिचे नुकसान झाले आहे. साळुंके विहार रस्ता परिसरात एमएनजीएलकडून गॅस पुरवठा करण्यात येतो. गॅसगळती झाल्याने वाहिनीने अचानक पेट घेतला. या घटनेची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला कळविली.

त्यानंतर त्वरित कोंढवा अग्निशमन दल केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या घटनेची माहिती एमएनजीएलला देखील कळविण्यात आली. त्यामुळे एमएनजीएलने त्या वाहिनीचा गॅस पुरवठा बंद केला. एमएनजीएलच्या तंत्रज्ञानी घटनास्थळी भेट देऊन गॅसवाहिनीची दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. दुरुस्तीनंतर या भागातील गॅसपुरवठा सुरळीत झाला, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT