pune fire 
पुणे

पुणे : प्रमुख बाजारपेठांचे होणार फायर ऑडिट; महत्वाच्या बदलांची महापौरांची घोषणा

सकाळ डिजिटल टीम

फॅशन स्ट्रीट येथे झालेल्या अग्नितांडवामुळे शहरातील गर्दीच्या ठिकाणांची, बाजारपेठांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. या बाजारपेठांची फॉयर ऑडिट करून तेथे महत्त्वाचे बदल केले जातील असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पुणे शहरातील कॅम्प भागातील फॅशन स्ट्रीटप्रमाणे लक्ष्मी रोड येथील तुळशीबाग, डेक्कन येथील हॉंगकॉंग लेन यांसह पेठांमधील गल्लीबोळातील विविध प्रकारच्या वस्तूंच्या बाजारपेठा यांसह उपनगरांध्ये भरणाऱ्या बाजारांत ग्राहकांची मोठी गर्दी असते. चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये लावलेली छोटीछोटी दुकाने, ग्राहकांची गर्दी यामुळे येथील सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. अशा ठिकाणी एखाद्या दुकानास आग लागल्यानंतर त्याचा धोका परिसरातील दुकानांना निर्माण होते. लोकांना पळून जाण्यासाठी लवकर वाट देखील मिळत नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्यांना रस्ता मिळत नसल्याने त्यांनाही अशा ठिकाणी पोहोचण्यास काहीसा विलंब होतो.
अशा ठिकाणी शॉट सर्किटमुळे आगी लागण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे दुकानांना झालेल्या वीज पुरवठ्याच्या वायरची वेळेवर तपासणी होणे गरजेचे असते, पण याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आगीच्या घटनांची शक्यता वाढते.

शॉर्टसर्किटमुळे घडतात आगीच्या घटना

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप म्हणाले, ‘‘तुळशीबाग, हॉंगकॉग लेन यांसह शहरातील इतर भागातील बाजारपेठेतील सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे येथील सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना करण्यासाठी तसेच, व्यापाऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे हे समजण्यासाठी अग्निशामक विभागाकडून फायर ऑडिट केले जाईल. दुकानांमध्ये आगीच्या घटना शॉटसर्किटमुळे घडतात, त्यामुळे वायरिंग चेक करणे गरजेचे आहे."

जागा मालकांनी खासगी संस्थेकडून फायर ऑडिट करणे गरजेचे

प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे म्हणाले, ‘‘महापालिकेच्या मालकीच्या ठिकाणचे फायर ऑडिट करण्याची जबाबदारी अग्निशामक विभागाची आहे. पण खासगी ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाण तेथे संबंधित जागा मालकाने खासगी संस्थेकडून फायर ऑडिट केले पाहिजे. यापूर्वी तुळशीबागेचे फायर ऑडिट झाले असून, तेथे हायड्रेन लाइन टाकावी अशी सूचना करण्यात आली होती, पण ते शक्य झाले नाही. पण तेथील व्यापाऱ्यांना आगीपासून वाचण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला खरंच T20 World Cup चा गांभीर्य असेल तर...! R Ashwin ने सांगितला विजयाचा मंत्र, इंग्लंडला अडचणीत आणणारी चाल...

जुन्या आठवणी आणि नव्या कथा; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घरबसल्या पाहा हे ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट

Latest Marathi News Live Update : कोयता गँग पुन्हा सक्रिय, 12 वीच्या विद्यार्थ्यावर हल्ला

MHT CET Admission : ‘एमएचटी सीईटी’च्या प्रवेश नोंदणीस २७ फेब्रुवारीपर्यंत विलंब शुल्कासह मुदतवाढ

Thane News: मुरबाड नगर पंचायतमध्ये सत्तांतराची नांदी? नगराध्यक्ष संतोष चौधरींची कसोटी; किसन कथोरेंना शह देणारे आता भाजपच्या गोटात

SCROLL FOR NEXT