Fire accident sakal
पुणे

Pune fire news : कोथरूड परिसरात पहाटे सदनिकेत आग

दोन विद्यार्थ्यांची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गुरुवारी पहाटेच्या सुमारास सोसायटीतील साधिकेला आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये अडकलेल्या दोन विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका अग्निशामक दलाच्या जवानांनी केली. हि घटना कोथरुड येथे घडली. कोथरूड येथील पौड रस्त्यावर असणाऱ्या आनंदनगर भागात "प्रभा को ऑप सोसायटी" आहे. या सोसायटीमध्ये गुरवारी पहाटे पावणे पाच वाजता आग लागल्याची खबर अग्निशामक दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मिळाली.

त्यानंतर काही वेळातच कोथरुड अग्निशामक दलाचे वाहन घटनास्थळी पोचले.घटनास्थळी पोहोचताच "प्रभा को ऑप सोसायटी" या तीन मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याने खिडकीमधून आगीच्या ज्वाळा बाहेर येत असल्याचे जवानांच्या निदर्शनास आले. तसेच आग लागलेल्या सदनिकेत दोन विद्यार्थी अडकले असल्याची माहितीही जवानांना मिळाली. त्यानंतर जवानांनी होज पाईप घेऊन दुसऱ्या मजल्यावर एकीकडे पाण्याचा मारा केला, तर दुसरीकडे घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशामक अधिकारी गजानन पाथ्रुडकर व जवान नितिन घुले यांनी तातडीने ब्रिदिंग ऑपरेटस सेट (श्वशन उपकरण) परिधान करुन आत एका खोलीत धुरामधे अडकलेल्या एक विद्यार्थी व एक विद्यार्थीनी यांना सुखरुप बाहेर काढत त्यांचा जीव वाचविला. याबरोबरच जवानांनी जेट स्प्रे व पाणी मारत सुमारे दहा मिनिटात पुर्ण विझवली.

आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून विद्यार्थी पहाटेपर्यंत अभ्यास करीत होते असे त्यांनी सांगितले. पुढच्या खोलीमधील लाकडी सामान, सोफा, कपाट, खिडक्या इत्यादी साहित्य जळाले. एका विद्यार्थ्याला किरकोळ स्वरुपात आगीची झळ हाताला लागली आहे. कोथरुड अग्निशमन केंद्र अधिकारी गजानन पाथ्रुडकर, वाहनचालक रमेश गायकवाड व जवान नितिन घुले, संजय महाले, शिवाजी कोंढरे, वैभव आवरगंड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma च्या कमबॅकमागे दोन 'unsung heroes'! हिटमॅनने मानले आभार; जाणून घ्या कोण ते? एक आहे अभिनेत्रीचा पती अन्...

Ambegaon Super 23 Initiative: आंबेगाव सुपर 23 उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेला चालना; माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा गौरवोद्गार

Asthma Day Warning: जागतिक दमा दिनानिमित्त तज्ज्ञांचा इशारा: वसई-विरार, मीरा रोड व मुंबईत वाढते श्वसन आजार

Maharashtra Weather : उकाड्यानंतर दिलासा! मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाची हजेरी

Manoj Tiwary : सत्ता जाताच, आपले फिरले! ममता बॅनर्जी सरकारवर भारतीय क्रिकेटपटूचे गंभीर आरोप; प. बंगालमध्ये होता क्रीडा मंत्री

SCROLL FOR NEXT