चिखल sakal
पुणे

Pune : महसूल विभागाचे तक्रारीकडे दुर्लक्ष; पहिल्याच पावसात खडकवासला-किरकटवाडी शीवरस्त्याला ओढ्याचे स्वरूप

चिखल, गाळामुळे नागरिकांचे हाल

सकाळ वृत्तसेवा

किरकटवाडी : तब्बल दहा ते पंधरा हजार लोकसंख्येसाठी एकमेव पर्याय असलेल्या सिंहगड रस्त्यावरील खडकवासला व किरकटवाडी या गावांच्या शीव रस्त्याला पहिल्याच पावसात ओढ्याचे स्वरूप आल्याचे दिसून आले.डोंगरावरील अवैध उत्खनाविरोधात नागरिकांनी केलेल्या तक्रारींकडे महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने वाहत आलेल्या गाळामुळे सध्या पायी चालणेही अवघड झाले आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक हाल सहन करावे लागत आहेत.

दिड ते दोन वर्षांपूर्वी खडकवासला व किरकटवाडी या गावांच्या शीवेवर असलेल्या डोंगरावर रस्त्याच्या नावाखाली अवैध खोदकाम करण्यात आले. या खोदकामामुळे डोंगरावरील नैसर्गिक प्रवाह बदलला आणि पावसाचे पाणी एकत्रित होऊन डोंगर उतारावरुन शीव रस्त्याने वाहू लागले. मागील वर्षी पावसाळ्यात रस्त्याला लागून असलेल्या अनेक घरं व दुकांमध्ये पावसाचे पाणी व गाळ शिरुन नुकसान झाले होते.

तसेच डोंगरावरून पाण्याबरोबर वाहत आलेला गाळ रस्त्यावर साचून पायी चालणे अवघड झाले होते. याबाबत नागरिकांनी महसूल विभागाकडे लेखी तक्रार केली होती मात्र त्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात न आल्याने यावर्षी पहिल्याच पावसात पुन्हा डोंगर उतारावरुन पाणी व गाळ वाहत आल्याने शीव रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले होते. याबाबत वेळीच दखल न घेतली गेल्यास अतिवृष्टीच्या वेळी घरे व दुकानांचे मोठे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

"मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात तहसील कार्यालयात याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर सहा ते सात वेळा तहसील,प्रांत व जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारले. प्रशासनाला परिस्थितीचे अजिबात गांभीर्य नाही. केवळ टोलवाटोलवी केली जात आहे. पाऊस सुरू असताना काय परिस्थिती असते ते अधिकाऱ्यांनी एकदा प्रत्यक्ष पाहावे. याबाबत कार्यवाही होणे अत्यंत आवश्यक आहे." शैलेंद्र मते, नागरिक, किरकटवाडी.

"खडकवासला-किरकटवाडी शीव रस्त्यावरील डोंगरावर झालेल्या खोदकामाची पाहणी करण्यास खडकवासला मंडळाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे." किरण सुरवसे, तहसीलदार, हवेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : जातपडताळणी समिती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार काम करते, त्यात सरकारचा हस्तक्षेप नाही; जरांगेंच्या आरोपावर फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं

२२ दिवसांपूर्वी उद्घाटन, एक्सप्रेसवे खचला; पॅचवर्क सुकवण्यासाठी लावले १० पंखे, VIDEO VIRAL

Asaram Bapu Bail Rejected : आसाराम बापूंना सुप्रीम कोर्टाचा झटका; अंतरिम जामीन अर्ज फेटाळला, नेमकं कारण काय?

WhatsApp ग्रुप चॅट्समध्ये मोठे बदल; '@all' टॅगसह आले ३ नवीन धमाकेदार फीचर्स!

Nitin Gadkari: घृणास्पद, आक्षेपार्ह आणि अश्लील कंटेंट; गडकरींची बदनामी करणाऱ्या पोस्ट हटवा, हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT