सुपे परिसरात प्रथमच रानगवे आले sakal
पुणे

पुणे : सुप्यात प्रथमच रानगव्यांचा कळप दिसला

सुपे परिसरात प्रथमच रानगवे आले आहेत.

जयराम सुपेकर

सुपे: सुपे ता. बारामती येथे सोमवारी सकाळी रान गव्यांचा कळप दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वनविभागाने त्यांना त्यांच्या अधिवासात सोडले जाणार असल्याची माहिती दिली.सुपे परिसरात प्रथमच रानगवे आले आहेत. येथील नवीन होणार्‍या मार्केट यार्डच्या परिसरात आज सकाळी चार रानगवे ग्रामस्थांना दिसले.या परिसरात मॉर्निंग वाकसाठी बरेच ग्रामस्थ जातात.चारा व पाण्याच्या शोधार्थ ते भटकुन गावात आले असावेत.

त्यांना त्यांच्या अधिवासात सोडण्यासाठी ॲनिमल रेस्क्यू टीम दाखल होत आहे. अशी माहिती प्रादेशिक वनविभागाच्या बारामती येथील वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांनी दिली. लोणकर म्हणाल्या गवा शांत प्राणी आहे परंतु, त्यांना जर त्रास दिला तर ते अटॅक करतात. त्यामुळे त्यांना त्रास देऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले तर त्यांना भरपाई मिळेल अशी माहिती त्यांनी दिली. मयुरेश्वर अभयारण्याचे वनपाल विनोद रणसिंग म्हणाले या परिसरात प्रथमच गवे आले आहेत. इको दौंडचे अध्यक्ष नचिकेत अवधानी, सर्पमित्र विलास वाकचौरे म्हणाले कोल्हापूर, राधानगरी, दाजीपूर येथे त्यांचे वास्तव्य आहे. पण ते भटकत इकडे आले आहेत.

दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल ( एसआरपीएफ ) गट क्रमांक पाच मुख्यालय परिसरात ११ जानेवारीला गव्यांची जोडी आढळली होती. त्यानंतर आज सुप्यात गव्यांचा कळप आला आहे. त्यांना तातडीने त्यांच्या आधीवासात सोडण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT