pm modi 
पुणे

PM Modi Metro Inauguration: नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो आणि राज्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न

District Court Metro Station to Swargate Metro Station: आज दुपारी पंतप्रधान मोदी ऑनलाईन उपस्थितीत राहून प्रतीक्षेत असलेला जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या मार्गाचे लोकार्पण केले.

कार्तिक पुजारी

Pune News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुण्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले. २६ सप्टेंबर रोजी निश्चित झालेला मोदींचा पुणे दौरा पावसामुळे रद्द झाला होता. आज दुपारी पंतप्रधान मोदी ऑनलाईन उपस्थितीत राहून प्रतीक्षेत असलेला जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या मार्गाचे लोकार्पण केले.

सकाळी 11 वाजता गणेश क्रीडा मंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. ज्याला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थितीत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमधून केली. पुण्यातील माझ्या सर्व लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना माझा नमस्कार, असं म्हणत त्यांनी संवादाला सुरुवात केली.

नरेंद्र मोदी काय म्हणाले?

पावसामुळं मला कार्यक्रम रद्द करावे लागले यात माझं नुकसान आहे. ज्या शहराला देशात एक वेगळं महत्त्व आहे तिथे मला येता आलं नाही. स्वारगेट मार्गावर मेट्रो धावायला लागेल. सावित्रीबाई यांचे स्मारक याचे सुद्धा आज भूमिपूजन करण्यात आलं. विठ्ठलाच्या आशीर्वादाने त्यांच्या भक्तांना फळ मिळालं आहे, कारण सोलापूर विमानतळ कार्यरत होत आहे. पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी आता लोकं थेट सोलापूरला विमानाने जाऊ शकतात, असं मोदी म्हणाले.

महाराष्ट्र राज्याला नवीन लक्ष्य ठेवण्याची गरज आहे.आज पुणे ज्या वेगाने वाढते आहे त्यात पुण्याची लोकसंख्या वाढतेय. या लोकसंख्याच सामर्थ्य वाढवण्याची गरज आहे. महायुतीची सरकार हाच विचार घेऊन दिवस रात्र काम करत आहे. पुण्याची आधुनिकता पाहता आधीपासूनच काम करायची गरज होती. मेट्रो आधीच यायला हवी होती पण दुर्दैवी आहे की शहरात प्लॅनिंग आणि व्हिजन या गोष्टीचा आभाव राहिला, असं ते म्हणाले.

कुठल्या ही योजना आल्या तर फाईल अडकून राहिल्या याच नुकसान पुण्याला सुद्धा झालं. पुण्यात मेट्रो बनवण्याचे २००८ मध्ये ठरले होते पण २०१६ मध्ये आम्ही काम करण्याचा निर्णय घेतला. मागच्या सरकारने तर मेट्रोचा एक पिलर बांधले नाही. डबल इंजिन सरकार आधी अनेक प्रकल्पांना उशीर झाला होता.आता एक लक्ष्य ठेऊन पुढे जायचं आहे.विकसित महाराष्ट्र, विकसित देशाचे केंद्र पुणे राहणार आहे, असं मोदी म्हणाले.

कुठल्या विकासकामांचे मोदींच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन झाले पाहूया

- जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुण्यातील पहिल्या भूमिगत मेट्रोच्या प्रवासी सेवेचा शुभारंभ

- स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन

- सोलापूर विमानतळाचे उद्घाटन

- भिडे वाडा येथील स्मारकाचे भूमिपूजन

- राज्यातील बिडकीन औद्योगिक क्षेत्र राष्ट्राला समर्पित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT