National Startup Award
National Startup Award Sakal
पुणे

पुण्यातील पाच स्टार्टअपला राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशातील औद्योगिक विश्र्वात नावीन्यपूर्ण संशोधन व विकास करणाऱ्या तरुण संशोधकांसाठी देण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार’वर पुण्यातील पाच स्टार्टअपने मोहर उमटवली आहे. नुकतेच हे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून राज्यातील एकूण ११ स्टार्टअपला हा सन्मान मिळाला आहे. या पुरस्कारासाठी देशभरातून दोन हजार १७७ अर्ज आले होते. त्यातील ४६ स्टार्टअपला हा सन्मान जाहीर झाला आहे. त्यातील ११ स्टार्टअप हे महाराष्ट्रातील आहेत. (Five StartUps In Pune Get National StartUp Award )

पुण्यातील स्टार्टअप :

१) अत्रेय इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (Atreya Innovations Private Limited)

सेक्टर : आरोग्य

संस्थापक : डॉ. अनिरुद्ध जोशी

स्टार्टअप विषयी : मनगटावरील नाडी तपासून शरीरातील रोगाचे निदान करणे व त्यावर उपाय सुचविणारे यंत्र या स्टार्टअपने तयार केले आहे. तुरीय नावाच्या उपकरणाच्या आधारे स्वत:ची प्रकृती रोजच्या रोज नीट कशी ठेवायची, यांच्या सूचना मिळतात.

२) रेपोज आयओटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Repos Iot India Private Limited)

सेक्टर : उद्योग

संस्थापक : चेतन वाळुंज आणि आदिती भोसले वाळुंज

स्टार्टअप विषयी : देशात डोअर टू डोअर डिझेल डिलिव्हरीच्या माध्यमातून रिपोस एनर्जीने अनेक क्षेत्रातील डिझेलचा प्रश्न सोडविला आहे. पुण्यात केवळ दोन लोकांच्या माध्यमातून सुरु झालेली ही कंपनी गेल्या ४ वर्षात १५० हून अधिक शहरांमध्ये पोहोचली आहे.

३) पिव्होचैन सोल्यूशन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (Pivotchain Solution Technologies Private Limited)

सेक्टर : सुरक्षा

संस्थापक : दीपक राव आणि योगेंद्र प्रताप सिंग

स्टार्टअप विषयी : हे व्हिडिओ विश्लेषण करणारे स्टार्टअप आहे. सरकारी आणि खासगी कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर कृत्रिम बुद्धिमत्ता चालवीत व्हिडिओ देखरेखसह भौतिक पायाभूत सुविधा सुरक्षित करण्यात मदत करते.

४) अपकर्व्ह बिझनेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (Upcurve Business Services Private Limited)

सेक्टर : प्रवास

संस्थापक : वरुण जैन आणि रवी कुमार

स्टार्टअप विषयी : सैन्यदले आणि निमलष्करी दलातील जवान, सेवानिवृत्त जवान व त्यांच्या कुटुंबीयांना सवलतीत विमान, रेल्वे व इतर प्रकारचे प्रवास, इलेक्ट्रॉनिक वस्तू उपलब्ध करून देण्याची सेवा हे स्टार्टअप पुरवीत आहे.

५) वेसाटोगो इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (Vesatogo Innovations Private Limited)

सेक्टर : शेती

संस्थापक : अक्षय दिक्षीत व टिम

स्टार्टअप विषयी : वेसाटोगो हे कृषी व्यवसाय आणि त्यांच्याशी संबंधित शेतकऱ्यांसाठी एक प्लॅटफॉर्म आहे जे त्यांना त्यांच्या कामकाजातील अकार्यक्षमता ओळखण्यात आणि त्या दूर करण्यात मदत करते. त्यातून शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होते. विविध प्रकारच्या सेवा हे स्टार्टअप पुरवते.

राज्यातील इतर स्टार्टअपची नावे :

१) स्क्वेअर पांडा इंडिया एलएलपी (Square Panda India LLP)

२) उन्नती एज्युकेअर प्रायव्हेट लिमिटेड (Unnati Educare Private Limited )

३) उंबो इडटेक प्रायव्हेट लिमिटेड (Umbo Idtech Private Limited)

४) बायोनिक होप प्रायव्हेट लिमिटेड (Bionic Hope Private Limited)

५) सागर डिफेन्स इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड - (Sagar Defence Engineering Private Limited)

६) सिक्रेटेक आयटी सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड - (Sequretek IT Solutions Private Limited)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Labour Day : एक दंगल झाली आणि त्यामुळे जगात कामगार दिन साजरा होऊ लागला, वाचा इतिहास

Maharashtra Din 2024 : बहु असोत सुंदर संपन्न की महा..प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.! महाराष्ट्र दिनाच्या द्या हटके शुभेच्छा

Loksabha Election 2024 : हुकूमशहांकडे महाराष्ट्र देणार नाही ! ; उद्धव ठाकरे यांनी मोदी, शहा यांच्यावर डागली तोफ

ढिंग टांग : भटकती आत्मा आणि बाबा बंगाली..!

SCROLL FOR NEXT