फुलबाजाराच्या इमारतीचे बांधकाम अर्धवट sakal
पुणे

पुणे : पाच वर्षानंतरही फुलबाजाराच्या इमारतीचे बांधकाम अर्धवट

५४ कोटींवरून १२५ कोटींवर खर्च; १४१ आडत्यांना मिळणार गाळे

प्रविण डोके

पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डात १२५ कोटीपेक्षा जास्त खर्च करून फुलबाजारासाठी ११ मजली इमारत उभा राहत आहे. परंतु पाच वर्षानंतरही इमारतीचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे फुलबाजार होणार की नाही या संभ्रमात सध्या व्यापारी आहेत.

बांधकाम सुरू असलेल्या नवीन फुलबाजारात १४१ आडत्यांना गाळे दिले जाणार आहेत. तर गाळ्यासाठी २३५ जण प्रतीक्षा यादीत आहेत. फूल बाजाराचे बांधकाम सुरू आहे. ते पूर्ण व्हायला अजून किती दिवस लागणार यायबबत फुल बाजारातील व्यापाऱ्यांना कोणतीही खात्री नाही. तसेच बाजारातील अनेक व्यापारी फुलबाजार आहे तिथेच रहावा यासाठी प्रयत्न करत आहेत.

फूल बाजारातून बाजार समितीला मिळणारे उत्पन्न कमी आहे. त्यामुळे खर्च निघण्यासाठी अनेक वर्ष प्रतिक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे उत्पन्न वाढविण्यासाठी फुलबाजाराला गाळे देऊन उरेलेल्या जागेतील गाळे व्यावसायिक वापरासाठी लिलाव पद्धतीने देण्यात येणार असल्याचे याआधी प्रशासनाने सांगितले आहे. तसेच अद्यावत फुल बाजारात बांधला जात आहे. परंतु फुल बाजारातील दोन संघटनांनी वेगळी वेगळी भूमिका मांडली आहे. फुलबाजार खालच्या मजल्यावर असावा की, वरच्या मजल्यावर याबाबत व्यापार्‍यात दोन गट आहेत. तर मागील पाच वर्षांपासून बांधकाम सुरू असून देखील काम अपूर्ण आहे. त्यामुळे काम पूर्ण होऊन गाळे कधी मिळणार याकडे व्यापाऱ्यांचे लक्ष आहे.

- पॉईंटर

- अद्यावत फुलबाजाराचे काम बांधकाम अर्धवट

- फुलबाजार कोणत्या मजल्यावर असणार याबाबत गोंधळ

- २०१६ मध्ये या फुलबाजाराच्या बांधकामाला सुरूवात

- बाजाराच्या उभारणीसाठी ५४ कोटी खर्च अपेक्षित होता

- बांधकाम लांबणीवर पडल्याने खर्च १२५ कोटीपेक्षा अधिक

- वर्षाकाठी फुलबाजारातून समितीला १.५० कोटीचे उत्पन्न

फुलबाजाराच्या इमारतीचे काम पूर्ण होण्यास अजून एक-दिड वर्ष लागेल. पूर्ण झाल्यानंतर पणन संचालक यांच्या मान्यतेने सध्याचे व्यापारी आणि प्रतीक्षा यादीत असणारे व्यापारी यांच्यामध्ये राखीव किंमतीपेक्षा जास्त दराने लिलाव करण्यात येणार आहे.

- मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे


सध्याचा नवीन फुलबाजारची बहुमजली इमारत ९० टक्के अडत्यांना मान्य नाही. बाजार आहे तिथेच रहावा अशी बहुतांशी अडत्यांची इच्छा आहे. फुलबाजार हा तळमजल्यावर असावा. फुलबाजार अडते असोसिएशने याबाबत सर्व्हे केला आहे. ग्राहक हा तळमजल्यावरच येतो. सहाव्या मजल्यावर फुलबाजार झाल्यावर खाली रस्त्यावर बेकायदेशीर व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढेल.

- अरुण वीर, अध्यक्ष, अखिल पुणे फुलबाजार अडते असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT