MP Supriya Sule sakal
पुणे

MP Supriya Sule : पुण्यातील या भागासाठी 'पॅकेज' जाहीर करा; खासदार सुप्रिया सुळे यांनी केली मागणी

पाटबंधारे विभाग आणि पुणे महापालिका यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे एकता नगरी, आनंद नगर परिसरातील नागरिकांवर पूर परिस्थिती ओढवली आहे.

सकाळ वृत्तसेवा

सिंहगड रस्ता - पाटबंधारे विभाग आणि पुणे महापालिका यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे एकता नगरी, आनंद नगर परिसरातील नागरिकांवर पूर परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे नागरिकांचे आयुष्य उध्वस्त झाले आहेत. सरकारने या भागासाठी वेगळे पॅकेज जाहीर करावे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

या भागात तीन टप्प्यात काम करण्यात यावे. रोजचे दिनक्रम सुरू होतील यासाठी प्रथम परिसराची संपूर्ण स्वच्छता करणे, पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणे , दिवसातून दोन वेळा फवारणी करणे आणि त्यांचे दैनंदिन आयुष्य सुरळीत होऊ शकेल अशी व्यवस्था करणे.

दुसऱ्या टप्प्यात नागरिकांना आर्थिक मदत मिळवून देणे, पुऱ्याच्या पाण्यात गेलेली महत्त्वाची कागदपत्रे आणि इतर आवश्यक त्या गरजा पूर्ण करणे, ज्यांची कागदपत्रे गहाळ झाली आहेत त्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करणे आवश्यक आहे. तिसर्‍या टप्प्यात या भागात पुन्हा पुराचे पाणी येऊ नये म्हणून कायमस्वरूपी उपाययोजना करणे अशी कामे झाली पाहिजे असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

एकता नगरी आणि परिसरात पुराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पाहणी केली नागरिकांच्या समस्या त्यांनी यावेळी जाणून घेतल्या नागरिकांशी विशेषता महिलांची त्यांनी संवाद साधला. यावेळी महिलांनी आपली कैफियत मांडली. 'पुराच्या पाण्यात आमचे घर-संसाराचे सर्वसामान, मुलांची वह्या-पुस्तके, कपडे, शाळेचा गणवेश असं सर्व काही वाहून गेले आहे. यावर आम्हाला मदत मिळावी आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा' अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली.

पाहणी दरम्यान खासदार सुळे यांच्या सोबतच काका चव्हाण, सचिन दोडके आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. एकता नगरी परिसरातील राधाकृष्ण विहार, राधाकृष्णनगरी ए आणि बी विंग, सोनाली, श्री भाग्यलक्ष्मी, रिद्धी-सिद्धी, स्वप्निल, प्रगती पार्क, आर्यन, अमेय, श्री गणेश,कुंज, शरयू, शिवाली, सीताली, शांताई, संगम, इत्यादी सोसायटी यांना भेट देऊन पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

Pune Overhead Cable Action: अनधिकृत ओव्हरहेड केबलवर महापालिकेची धडक कारवाई कायम; इंटरनेट बंद पडल्याने ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरदारांची तारांबळ

GT vs RR Live : वैभव सूर्यवंशीची विक्रमी कामगिरी! यशस्वी जैस्वालसोबत मोडला सेहवाग-गंभीरचा विक्रम, रिषभ पंतवरही केली कुरघोडी

Pune News: शाळेतील फी वाढ अन्यायकारक! पुण्यात पालकांचं आंदोलन; मनसेच्या आंदोलकांनी केली पैशांची उधळण

SCROLL FOR NEXT