पुणे

‘शेवंती’ रुसल्याने उत्पादक संकटात

CD

माळशिरस, ता. २ : मागील महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवल्याने पुणे बाजारपेठेत शेवंतीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाजारभावात घसरण झाल्याने शेवंती प्रतिकिलो सुमारे १० ते २० रुपयांनी विकली जात आहे. यातून तोडणी आणि वाहतुकीचा खर्च निघणेही कठीण झाल्याने जिल्ह्यातील फूल उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत.

पाऊस नसल्याने फुले खराब होण्याचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे बाजारात फुलांची आवक वाढली आहे. श्रावण महिन्यात पांढऱ्या ‘भाग्यश्री’ फुलांना मोठी मागणी असते. हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात नियोजन केले होते. दरवर्षी पावसामुळे आवक मर्यादित राहून भाव टिकून राहतात, मात्र यंदा पावसाअभावी आवक वाढल्याने फुले विक्रीविना शिल्लक राहत आहेत. हलक्या दर्जाच्या फुलांना तर उठावच नाही. ही स्थिती पाहता यंदाचा गणपती हंगाम वाया जाण्याची भीती फुल उत्पादकांना वाटत आहे.

मागील वर्षीचा बाजारभाव विचारात घेऊन यंदा ३०००० भाग्यश्री रोपांची लागवड केली होती. लागवडीपासूनचा खर्च विचारात घेता दोन लाखापर्यंत खर्च झाला असून सध्या असलेले हे बाजारभाव पाहता उत्पादन खर्च देखील निघणे अवघड झाले आहे. सद्यःस्थितीत अशा बाजारात फुले विक्रीसाठी घेऊन जाणे देखील परवडत नाहीत.
- शरद गायकवाड, शेवंती फूल उत्पादक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : बंटी पाटलांचा महायुतीला दणका! गोकुळ दूध संघ निवडणुकीत समविचारी आघाडीची सत्ता स्थापनेकडे वाटचाल

Petrol Diesel Price: आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण; भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का?

त्याने स्वतःच स्वतःचा जीव घेतला... लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनावर भाऊ पुरुषोत्तम बेर्डे यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले- कुणाचंही ऐकलं नाही...

Gokul Election Result 2026 : ब्रेकिंग न्यूज! नविद मुश्रीफ पराभूत; सतेज पाटलांची आघाडी १४ जागांवर आघाडी

Namo Shetkari Yojana Latest Update : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? 5 हजारांची दुष्काळी मदत घोषित, पण नमो शेतकरी योजनेच्या 4 हजारांचे काय?

SCROLL FOR NEXT