पुणे, ता. २२ : संभाव्य चाराटंचाईवर मात करण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्ह्यात १०,१०० हेक्टर क्षेत्रावर चारा लागवड करून सुमारे साडेपाच लाख टन उत्पादन घेतले जाणार आहे. सध्याचा साठा केवळ तीन महिने पुरणार असल्याने पशुधनाची उत्पादकता टिकविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
जिल्ह्यातील वैयक्तिक शेती, गटशेती आणि सिंचनाची सुविधा असलेल्या जमिनीवर चारा लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक गावातील उपलब्ध सिंचन क्षेत्राचा पुरेपूर वापर करून उत्पादन वाढविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. चारा उत्पादन वाढविण्याबरोबरच त्याची साठवणूक आणि योग्य व्यवस्थापन यावरही विशेष लक्ष दिले जाणार आहे. हिरवा चारा उपलब्ध असतानाच त्यापासून मुरघास तयार करून ठेवल्यास टंचाईच्या काळात त्याचा प्रभावी उपयोग होऊ शकतो. त्यामुळे लागवडीपासून ते साठवणुकीपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेवर पशुसंवर्धन विभाग लक्ष ठेवणार आहे.
जिल्ह्यातील पशुधन (आकडेवारी)
एकूण पशुधन : १८.७० लाख
मोठे पशुधन : ७ लाख २४ हजार ९००
लहान पशुधन : ३ लाख १० हजार ३२५
शेळ्या-मेंढ्या : ८ लाख ३५ हजार ५८९
महत्त्वाचे मुद्दे
शेतकऱ्यांना देण्यासाठी बियाणे वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
येत्या आठ ते दहा दिवसांत बियाणे उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
तालुकानिहाय नियोजनानुसार शेतकऱ्यांना बियाणे वितरित केले जाईल.
चाऱ्याचे प्रमाण वाढविण्यासोबतच त्यातील पौष्टिक घटक टिकविण्यावर भर.
प्रशासनाची त्रिसूत्री
संभाव्य चाराटंचाईला तोंड देण्यासाठी प्रशासनाने त्रिसूत्री कार्यक्रम आखला आहे. यामध्ये सिंचन क्षेत्रात चारा लागवडीला प्रोत्साहन देणे, शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे उपलब्ध करून देणे आणि मुरघासाच्या माध्यमातून चाऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने साठवणूक करण्यावर भर दिला जात आहे.
चाराटंचाईच्या काळात जिल्ह्यातील पशुधनाची उत्पादकता कमी होऊ नये, यासाठी जास्तीत जास्त चारा उत्पादन करण्यावर आमचा भर आहे. पशुपालकांनी स्वतः पशुखाद्य तयार करणे, मिनरल मिक्सचरचा योग्य वापर आणि चारा व्यवस्थापन याबाबत संपूर्ण जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत आहे.
- डॉ. राजेशकुमार वासनिक, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.